Manoj Jarange Patil l ऑडिओ क्लिपचा सोर्स देण्यास जरांगेंची अट

Manoj Jarange Patil l ऑडिओ क्लिपचा सोर्स देण्यास जरांगेंची अट

Published : Nov 05, 2026, 08:00 PM IST

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप SIT कडे देण्याची तयारी दर्शवली. मात्र क्लिपचा सोर्स हवा असल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सार्वजनिकपणे स्वीकारावी, अशी अट घातली. शिंदे आणि फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपल्याविरोधात काही लोक पैसे घेऊन बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना दिलेली ₹५,००० मदत अपुरी असून हेक्टरी ₹१ लाख नुकसानभरपाईसाठी दिवाळीनंतर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, कर्ज काढून दिवाळी साजरी करू नये, असं आवाहनही केलं. शरद पवारांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी इच्छाही व्यक्त केली.