भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे: हरियाणातील प्रायोगिक धाव

नवीकरणीय पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरात क्रांतिकारी पाऊल टाकत भारतीय रेल्वे पुढील महिन्यात देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची चाचणी घेण्यास सज्ज झाली आहे.

नवी दिल्ली: नवीकरणीय पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरात क्रांतिकारी पाऊल टाकत भारतीय रेल्वे पुढील महिन्यात देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची चाचणी घेण्यास सज्ज झाली आहे.

डिसेंबर महिन्यात हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यानच्या ९० कि.मी. मार्गावर हायड्रोजनवर चालणारी रेल्वे चाचणी धाव घेईल. यशस्वी झाल्यास पुढील वर्षी एकूण ३५ हायड्रोजन रेल्वे चालविण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय आहे.

डिझेलला यशस्वी पर्याय:

सध्या देशातील रेल्वे गाड्या वीज आणि डिझेल इंधन वापरून चालतात. हायड्रोजन वापरल्यास डिझेलमुळे वातावरणात होणारे कार्बन उत्सर्जन टाळून प्रदूषण कमी करता येईल. तसेच, हायड्रोजन हा स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेला इंधन आहे. २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे रेल्वे विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यास हे पूरक आहे.

वातावरणात पाण्याचे कण उत्सर्जित:

अत्यंत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन रेल्वे इंजिन तयार करण्यात आले आहे. यात हायड्रोजनचे कण वीज निर्माण करून इंजिन चालवतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यावर वीज निर्मिती होते. या प्रक्रियेत केवळ पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात.
जिंद-सोनीपत मार्गावर रेल्वेची वाहतूक कमी असल्याने आणि हायड्रोजन रेल्वे चालविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान जवळपास उपलब्ध असल्याने हा मार्ग निवडण्यात आला आहे. जर्मनी आणि चीनमध्ये आधीच हायड्रोजन रेल्वे चालत आहेत.

Share this article