महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी तथाकथित बाबा अशोक खरात प्रकरणावर मोठं विधान केलं. महिलांची फसवणूक करून गैरकृत्य केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आधीपासूनच सापळा रचून कारवाई केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं जात असल्याचं सांगत, दोषी कुणीही असो त्याला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. उद्या सविस्तर निवेदन देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.