
सनातन धर्माच्या संस्कृती संसद कार्यक्रमात संत-महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास विरोधकांना सहन होत नसल्याचा आरोप करत तीन वेळा जनतेने नाकारल्यामुळे विरोधक सत्तेविना तडफडत असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधींकडे आंदोलन आणि चर्चेचं आव्हान देण्यासाठी वेळ आहे, तर मोदी देशाच्या विकासासाठी काम करत असल्याचं शिंदेंनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चा हा न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचा आरोप करत पंतप्रधानांवरील वैयक्तिक टीकेचाही त्यांनी निषेध केला.