Chandrashekhar Bawankule l EVMवरून बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल!

Chandrashekhar Bawankule l EVMवरून बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल!

Published : Nov 05, 2026, 09:02 PM IST

नागपुरात 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव' पदयात्रेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेत विदर्भातून ५० हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस जिंकली तर EVM योग्य आणि भाजप जिंकला तर EVM खराब कशी, असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेबाबत खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला. फडणवीस सरकारने ३३ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, ४५ लाख शेतकऱ्यांची वीजबिल माफी आणि ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांना आगाऊ मदत दिल्याचं सांगितलं. संविधानाचा सन्मान आणि लोकशाही संस्थांवरील विश्वास कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.