Indian Spices : हाँगकाँग, सिंगापूरमध्ये भारतीय मसाला ब्रँडवर बंदी घातल्यानंतर केंद्राने उचलले मोठे पाऊल

हॉंगकॉंग आणि सिंगापूरमध्ये एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा विभाग अलर्ट मोडवर आले असून देशभरातील या दोन्ही कंपन्यांमधून मसाल्याचे नमुने जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचा फटका इतर मसाला कंपनीला देखील बसणार आहे.

Ankita Kothare | Published : Apr 22, 2024 12:12 PM IST / Updated: Apr 22 2024, 05:47 PM IST

हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा विभागाने भारतातील एमडीएच आणि एव्हरेस्टच्या काही मसाल्यांमध्ये एथिलिन ऑक्साइड हे कीटकनाशक आढळल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली असून नागरिकांनी या मसाल्यांचा वापर करू नये असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर या मसाल्यांची विक्री थांबवण्याचे निर्देश देखील दिले आहेत.तर दुसरीकडे सिंगापूरमध्येही एव्हरेस्टच्या फिश करी मसाले मसाल्यात एथिलिन ऑक्साइड आढळल्याने या मसाल्यावर बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही देशाच्या निर्णयानंतर भारत सरकारने एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्याचे संपूर्ण देशातून नमुने जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच फक्त एमडीएच आणि एव्हरेस्ट नव्हे तर इतर मसाल्यांच्या कंपन्यांमधून देखील नमुन गोळा करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहे.

काही सरकारी सूत्रांच्या माहिती नुसार, पूर्ण देशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.तीन ते चार दिवसात संपूर्ण नमुने गोळा करण्याचे आदेश जारी केल्या नंतर अधिकाऱ्यांची एकाच धावपळ उडाली आहे. केवळ एमडीएच आणि एव्हरेस्टच नाही तर सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून नमुने घेतले जाणार आहेत.हे नमुने अधिक तापासाठी प्रयोगशाळेतमध्ये दिले जातील. त्यानंतर 20 दिवसांत प्रयोगशाळेतून अहवाल येणे अपेक्षित आहे.

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने काढले शोधून :

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यात इथिलीन ऑक्साईड असल्याचे शोधून काढले आहे. त्यानंतर दोन्ही देशाच्या अन्न प्रशासनाने लोकांना या मसाल्यांचा वापर टाळण्यास सांगितले आहे. तसेच या मसाल्यात मर्यादेपेक्षा जास्त इथिलीन ऑक्साईड असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईडमधील 'ग्रुप 1 कार्सिनोजेन' म्हणून वर्गीकृत केले आहे.

या मसाल्यांमध्ये आढळले इथिलीन ऑक्साईड :

एमडीएच चे मद्रास करी पावडर,सांभर मसाला आणि करी पावडर तर एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यामध्ये देखील इथिलीन ऑक्साईड असल्याचे समजले आहे.

भारतात इथिलीन ऑक्साईड वापरण्यास बंदी :

या संपूर्ण प्रकरणावर अजूनही दोन्ही कंपन्यांमधून कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच भारतात खाद्यपदार्थांमध्ये इथिलीन ऑक्साईड वापरण्यास बंदी आहे.त्यामुळे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या भारतीय मसाल्यांमध्ये हानिकारक पदार्थ आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे देखील म्हंटले जात आहे.

 

Share this article