IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान, गौरी खान आणि 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. आर्यन खान दिग्दर्शित या सीरिजमध्ये त्यांची प्रतिमा डागाळणारे पात्र दाखवून बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
अनेक ठिकाणी माझी बदनामी केली जातेय, IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा चढला पारा
IRS अधिकारी समीर वानखेडे हे कायमच चर्चेत राहत असतात. ते आता परत एकदा माध्यमांमध्ये दिसून आपले आहेत. IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान, गौरी खान आणि बॅड्स ऑफ बॉलिवूड या सीरिजचे निर्माते यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
26
गेल्या आठवड्यातील सुनावणी ढकलली पुढे
गेल्या आठवड्यातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता समीर वानखेडे हे दुरुस्तीनंतर दुसरी याचिका दाखल करणार आहेत. त्यासंदर्भातील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात लवकरच होणार आहे.
36
समीर वानखेडे यांनी कोणता आरोप केला?
समीर वानखेडे यांचा आरोप आहे की आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलिवूड या सीरिजमध्ये त्यांच्यासारखे दिसणारे एक पात्र दाखवले गेले आहे, ज्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली गेली असून त्यांची बदनामी झाली आहे.
पहिल्या याचिकेवरील सुनावणी पार पडली असून ती २६ सप्टेंबर रोजी झाली आहे. यावेळी न्यायाधीशांनी समीर वानखेडे यांना फत्करल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळं याबाबतची याचिका परत दाखल करण्यात आली आहे.
56
समीर वानखेडे यांच्यामुळे शाहरुख खानच्या अडचणींमध्ये वाढ
समीर वानखेडे यांच्यामुळे शहरीख खानच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या वेब सिरीज "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" शी संबंधित मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा सुनावणी सुरू केली.
66
वानखेडे यांच्या वकिलाने न्यायालयाला काय माहिती दिली?
वानखेडे यांच्या वकिलाने न्यायालयाला माहिती दिली आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, दिल्ली न्यायालयाचे या प्रकरणावर अधिकार क्षेत्र आहे. समीर वानखेडे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, "मला आणि माझ्या पत्नीला ट्रोल करण्यासाठी काही URL वापरल्या जात आहेत; या पोस्ट या प्रकरणाशी संबंधित आहेत."