मी गरीब घरातून आलेली मुलगी, ट्रोलिंगचा सामना करावा लागलेल्या गौतमी पाटीलच्या डोळ्यात आलं पाणी

Published : Oct 08, 2025, 11:37 AM IST

गौतमी पाटील: पुण्यातील कार अपघाताच्या घटनेनंतर गौतमी पाटीलने माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. अपघात झाला तेव्हा आपण गाडीत नव्हतो आणि मदत देऊ करूनही ती नाकारण्यात आली, असे सांगताना गौतमी भावुक झाली. 

PREV
16
मी गरीब घरातून आलेली मुलगी, ट्रोलिंगचा सामना करावा लागलेल्या गौतमी पाटीलच्या डोळ्यात आलं पाणी

गौतमी कायमच माध्यमांच्या चर्चेत राहत असते. ती तिच्या नृत्यासाठी खासकरून प्रसिद्ध असून महाराष्ट्रात तिचा फॅन बेस मोठा आहे. ती पुण्यातील अपघातावरून परत एकदा माध्यमांमध्ये दिसून आली. 

26
गौतमीच्या डोळ्यात आलं पाणी

गौतमीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं आहे. गौतमीने माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली असून त्यावेळी ती भावुक झालेली दिसून आली. रिक्षाचालकाला भेटणार नसल्याचं तिने सांगितलं आहे.

36
मी त्या कारमध्ये नव्हते

अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते. माझी कार माझ्या कारचालकाकडे होती. शिवाय मला ज्यावेळी समजलं त्यावेळी मी भरभरून मदत केली. मी माझ्या मानलेल्या भावाकडून रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मदत पाठवली.

46
त्यांच्याकडून मदत नाकारली

त्यांच्याकडून मात्र मदत नाकारण्यात आली. त्यांना मी म्हटलं जे काही चाललंय ते आपण कायदेशीर करू तर सगळंच कायदेशीर मार्गाने करूयात असं म्हटलं. मी गरीब घरातून आलेली मुलगी आहे.

56
मी गरीब घरातून मागितली आलेली मुलगी आहे

मी गरीब घरातून आलेली मुलगी आहे. माझ्याकडून पाठवण्यात आलेली मदत त्यांनी नाकारली. पहाटे अपघात झाला, त्यांच्याशी दुपारी माझं बोलणं झालं. नंतर कोणी काही बोलत आहे त्याचा काहीच अर्थ नाही असं तिने म्हटलं आहे.

66
मला नाहक बदनाम केलं जात

जिथे माझा काही संबंध नाही, तिथे माझं ना बदनाम केलं जात. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिल. कारची कागदपत्र, चालकाचे तपशील ही सर्व माहिती मी पोलिसांना दिली आहे. यावेळी बोलताना गौतमी भावुक झाली होती.

Read more Photos on

Recommended Stories