स्मिता पाटील: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणांची आठवण सांगितली आहे. स्मिता यांची मृत्यूनंतर सुवासिनीसारखा शृंगार करण्याची इच्छा होती, जी सावंत यांनी रडत रडत पूर्ण केली.
तिने डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले, मृत्यूपूर्वी स्मिता पाटील राज बब्बर यांच्याशी काय बोलल्या?
प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील या अधून मधून चर्चेत येत असतात. त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत हे पॉडकास्टमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी स्मिता पाटीलसोबतचा किस्सा सांगितलं आहे.
26
मेकअप आर्टिस्ट काय म्हणाले?
मेकअप आर्टिस्ट म्हणाले की, स्मिता पाटील अनेकदा म्हणायच्या की मी मेल्यावर मला सुवासिनी बनूननच घेऊन जा. मी त्यांना असं अभद्र बोलू नका म्हणून खडसवायचो. त्या त्यांच्या आईलाही असेच सांगायच्या, त्यामुळे त्यासुद्धा त्यांना ओरडायच्या."
36
भावुक होऊन आठवण केली शेअर
स्मिता पाटील यांचे मेकअप करताना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, "त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांची बहीण शिकागोहून येत होती त्यांना येण्यासाठी 2-3 दिवस लागणार होते. या काळात, त्यांचे शरीर बर्फावर ठेवले होते, ते सुजले होते."
ते बोलताना म्हणाले की, "अमिताभ बच्चन आणि इतर लोक तिथे बसले होते. त्यांच्या आईने मला एक मेकअप किट दिला आणि म्हणाल्या की ती मरणानंतर तिला सुवासिनीसारखा शृंगार करुन जायची इच्छा होती. मी रडू लागलो आणि रडत रडत त्यांचा मेकअप केला. मी त्यांचा शेवटचा मेकअप केला. त्या शेवटच्या दिवशीही खूपच सुंदर दिसत होत्या."
56
राज बब्बर यांनी पहिले लग्न कोणाशी केले?
राज बब्बर ज्या वेळी स्मिताच्या प्रेमात पडले त्यावेळी ते आधीच विवाहित होते. त्यांनी लग्न केले आणि प्रतीकचा जन्म झाला. परंतु बाळंपणात स्मिताचा मृत्यू झाला. त्यानंतर राज पुन्हा नादिरासोबत राहायला गेला.
66
राज बब्बर काय म्हणाले?
राज बब्बर म्हणाले, "घरापासून हॉस्पिटलपर्यंत, ती सतत माफी मागत राहिली आणि मी तिला सांगितले की सर्व काही ठीक होईल. तिने डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले. तिचा चेहरा सर्व काही सांगत होता. एक तासानंतर, डॉक्टर आले आणि मला सांगितले की ती कोमात गेली आहे. मी तिचा एक भाग होतो आणि ती माझा एक भाग होती.