विक्की कौशलच्या चाहत्यांसाठी 'Bad Newz', तृप्ती डिमरीसोबतच्या 'त्या' सीनवर सेंन्सर बोर्डाची कैची

Published : Jul 16, 2024, 04:42 PM ISTUpdated : Jul 16, 2024, 05:21 PM IST
Triptii Dimari and Vicky Kaushal Upcoming Movie

सार

Vicky Kaushal Bad Newz Movie : विक्की कौशलचा आगामी सिनेमा बॅड न्यूज येत्या शुक्रवारी (19 जुलै) रिलीज होणार आहे. याआधी सिनेमाचवर सेंसर बोर्डाने कैची चालवली आहे. सेंसर बोर्डाकडून सिनेमातील 27 सेकंदाच्या सीनमध्ये बदल करण्यास सांगितला आहे.

Bad Newz Movie Update : अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि तृप्ती डिमरीच्या (Tripti Dimri) ‘तोबा तोबा’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सिनेमा येत्या 19 जुलैला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षक विक्की आणि तृप्तीची केमिस्ट्री पाहण्यास उत्सुक आहेत. पण त्याआधी सेंसर बोर्डाने विक्की आणि तृप्तीच्या 27 सेंकंदाच्या एका सीनवर कैची चालवली आहे. सिनेमात विक्की कौशल आणि तृप्ती डिमरीचे तीन वेगवेगळे किसिंग सीन्स आहेत. एक 9 सेकंदाचा, दुसरा 10 सेकंदाचा आणि तिसरा 8 सेकंदाचा सीन होता.

रिलीजआधी बॅड न्यूज सिनेमात बदल
सेंसर बोर्डाने बॅड न्यूज सिनेमातील 27 सेकंदाचा किसिंग सीन कापण्याएवजी त्यामध्ये बदल करावेत असे सांगितले आहे. यामुळे आता निर्माते लिप-लॉक सीन्सला कशाप्रकारे बदलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय सिनेमाच्या सुरुवातीचे डिस्क्लेमर बदलण्यासह मद्य विरोधातील मेसेजचा फॉन्ट वाढवण्यासही सांगितले आहे. या सर्व बदलावानंतरच सिनेमाला सेंसर बोर्डाकडून U/A सर्टिफिकेशन मिळाले आहे. सिनेमा 2 तास 22 मिनिटांचा असणार असल्याचे सांगितले जात आहे.

बॅड न्यूज सिनेमाबद्दल थोडक्यात
बॅड न्यूज सिनेमा एक कॉमेडी-ड्रामा आहे. याची कथा प्रेग्नेंट महिलेच्या (तृप्ती डिमरी) आजूबाजूला फिरणारी आहे. ही महिला मुलाचा वडील कोण याबद्दल फार कंफ्यूज असल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय सिनेमाची कथा अधिक मजेदार अशावेळी होते तेव्हा विक्की कौशल मुलाचा बाबा होऊ शकतो असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. खरंतर, सिनेमाची कथा खऱ्या घटनेवर आधारित आहे.

बॅड न्यूज सिनेमातील तिसऱ्या गाण्यावर प्रेक्षक भडकले
आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅड न्यूज सिनेमातील तिसरे गाणे मेरे महबूब मेरे सनम 14 जुलैला प्रदर्शित करण्यात आले. खरंतर, गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. याचे मूळ गाणे महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा डुप्लिकेटमधील आहे. यामध्ये शाहरुख खान, सोनाली बेंद्रे आणि जूही चावला मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

दरम्यान, सिनेमातील आधीची दोन गाणी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी ठरली आहेत. पण तिसऱ्या गाण्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. रिक्रिएट करण्यात आलेले गाणे प्रेक्षकांना आवडलेले नाही. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सकडून दिल्या जात आहेत.

आणखी वाचा : 

Katrina Kaif की Vicky Kaushal? कपलमधील सर्वाधिक कोण शिकलेय?

बॉलिवूडमधील या 5 Horror सिनेमांचे शूटिंग चक्क भूताटकी ठिकाणांवर झालेय

PREV

Recommended Stories

Bigg Boss 19 विजेता गौरव खन्नाची पहिली पोस्ट, या लोकांबाबत व्यक्त केल्या कृतज्ञ भावना
कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी