अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला पत्नीसोबत आलेल्या अक्षय कुमारला पाहून नेटकऱ्यांनी उपस्थितीत केले प्रश्न, म्हणाले...

Published : Jul 15, 2024, 11:04 PM IST
Akshay Kumar At Anant Ambani Reception

सार

12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाला. याआधी अशी बातमी आली होती की, अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लग्नसहोळ्याला येणार नाही. पण आता रिसेप्शनला आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

Anant-Radhika Wedding Reception : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचे तिसरे रिसेप्शन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाला. तिसरे रिसेप्शन अशा पाहुण्यांसाठी होते जे, अनंत-राधिकाच्या पहिल्या दोन रिसेप्शनला आले नाहीत. खासकरुन मीडिा आणि अंबानी संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. अंबानी परिवाराने संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत वेगवेगळ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. याच रिसेप्शनला अभिनेता अक्षय कुमारने पत्नीसोबत एण्ट्री केली.

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला अक्षय कुमारची उपस्थिती
सुपरस्टार अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत सोमवारी अनंत-राधिकाच्या तिसऱ्या वेडिंग रिसेप्शनला पोहोचला. याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अक्षयने रिसेप्शनसाठी पांढऱ्या रंगातील कुर्ता आणि ट्विंकलने ही चमकदार सूट परिधान केल्याचे दिसून येत आहे. अक्षयचा व्हिडीओ पाहून इंटनेटवरील युजर्सने वेगवेगळ्या कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.

युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया
अनंत-राधिकाच्या अखेरच्या वेडिंग रिसेप्शनला अक्षय कुमारला पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, घरीच रहायचे होते. नंतर भेटला असता. दुसऱ्याने लिहिले की, आता अंबानी परिवाराला देखील कोरोना होईल. तिसऱ्याने म्हटले, अक्षयला तर कोरोना झाला होता ना?. याशिवाय अन्य युजरने म्हटले की, कोरोना दोन दिवसात कसा ठिक झाला?. दरम्यान, अक्षय कुमारला कोरोना झाल्याने तो अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला येणार नसल्याची बातमी समोर आली होती. यावर आता अक्षय काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी वाचा : 

हिना खान कामावर परतली, इंस्टाग्रामवर Video शेअर करत कॅन्सरशी लढणाऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

'काही चुकले असल्यास माफ करा...', नीता अंबानींनी मागितली फोटोग्राफर्संची माफी

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!