Sarfira V/S Indian 2 : ओपनिंग विकेंडला अक्षय कुमारच्या सिनेमाला कमल हसन यांची टक्कर, वाचा BO वरील कमाई

Published : Jul 16, 2024, 12:56 PM IST
Sarfira V/S Indian 2 collection day 4

सार

Sarfira Vs Indian-2 Movie : अक्षय कुमारचा सरफिरा आणि कमल हसन यांचा इंडियन-2 सिनेमा एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या दोन्ही सिनेमांचे चौथ्या दिवसाच्या कलकेक्शनची आकडेवारी समोर आली आहे.

Sarfira Vs Indian-2 Movie Box Office Collection Day 4 : अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ आणि कमल हसन यांचा ‘इंडियन-2’ सिनेमा 12 जुलैला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. अशातच दोन्ही सिनेमांचे चौथ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. Sacnilk.Com च्या रिपोर्ट्सनुसार, दोन्ही सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईत घट झाल्याचे दिसून आले आहे.

अक्षय कुमारच्या सरफिरा सिनेमाचे बॉक्स ऑफिसवर 1.40 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रविवारी सिनेमाने 5.25 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या बाजूला कलम हसन यांच्या इंडियन-2 सिनेमाने चौथ्या दिवशी 3.15 कोटी बॉक्स ऑफिसवर कमावले. सिनेमाने रविवारी (15 जुलै) 15.35 कोटी रुपयांची कमाई केली होती.

बॉक्स ऑफिसवरील सरफिरा सिनेमाची स्थिती
सरफिरा सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. पण पहिल्याच दिवसाची आकडेवारी समोर आली असता ट्रेड अ‍ॅनलिस्ट्सही हैराण झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसी सिनेमाच्या कमाईत थोडी वाढ झाल्याचे दिसून आले. शनिवारी सिनेमाने 4.25 कोटी आणि रविवारी 5.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दरम्यान, सोमवारी (16 जुलै) सिनेमाच्या कमाईत जबरदस्त घट झाल्याचे दिसून आले. सिनेमाने केवळ 1.40 कोटी रुपयेच कमावले. अशातच सिनेमाची एकूण कमाई 13.40 कोटी रुपये झाली आहे.

कमल हसन यांचा इंडियन-2 सिनेमाचे कलेक्शन
कमल हसन यांचा इंडियन-2 सिनेमाला संमिश्र रिव्हू मिळाले आहेत. तरीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. सिनेमाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईत घट झाली आहे. 12 जुलैला सिनेमा प्रदर्शितझाल्यानंतर 26.6 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे 18.2 कोटी रुपये आणि 15.35 कोटी रुपयांची कमाई केली हती. पण चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाल्याचे दिसून आले आहे. सिनेमाने सोमवारी बॉक्स ऑफिसवर 3.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे इंडियन-2 सिनेमाने एकूण 62.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सरफिरा Vs इंडियन-2 सिनेमा
अक्षय कुमारचा सरफिरा सिनेमा साउथमधील सोरारई पोटरुचा हिंदी रिमेक आहे. साउथ सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला पण हिंदीत मिळत नाहीये. सिनेमाचे दिग्दर्शन सुधा कोंगरा यांनी केले आहे. सिनेमामध्ये राधिक मदान, परेश रावल आणि सीमा बिस्वाव आहे.

इंडियन-2 सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास याच्या रिलीजची गेल्या चार वर्षांपासून वाट पाहिली जात होती. सिनेमा अखेर 12 जुलैला प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले असून कमल हसन मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, गुलशन ग्रोवरही सिनेमात झळकले आहेत.

आणखी वाचा : 

Katrina Kaif की Vicky Kaushal? कपलमधील सर्वाधिक कोण शिकलेय?

Rakul Preet Singh चा भाऊ अमन प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणात हैदराबाद पोलिसांकडून अटक

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?
Ranabaali Box Office: 'रणबाली'ची तिकीट खिडकीवर हवा! आतापर्यंत विकली गेली २० लाखांहून अधिक तिकिटे