राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी या दिग्गजांनी लावली उपस्थिती, पाहा Photos
अयोध्येतील वातावरण राममय झाले आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला व्हीव्हीआयपी ते सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. याचे फोटो समोर आले आहेत.
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांनी उपस्थिती लावली आहे.
27
कंगना राणौत
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ट्रेडिशनल लुकमध्ये दिसून आली.
37
रामचरण
साउथ अभिनेता रामचरण देखील चिरंजीवी यांच्यासोबत अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आला आहे.
47
बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. यासाठी रणबीर कपूर, आलिया भट, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, विक्की कौशल अयोध्येत दाखल झाले आहेत.
57
नीता-मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी अयोध्येत आले आहेत.
67
रजनीकांत
साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनीही अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थिती लावली आहे.
77
राम मंदिरात रामधुन
गायिका अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन ते सोनू निगम यांनी अयोध्येत रामधुन गात मंदिराचा परिसर राममय केला.