BB Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आर्या आणि जान्हवीमध्ये तुफान राडा, VIDEO

Published : Aug 02, 2024, 09:23 AM ISTUpdated : Aug 02, 2024, 09:27 AM IST
Bigg Boss Marathi Season 5 Updates

सार

BB Marathi Season 5 : कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये दररोज नवे ट्विस्ट आणि नवे वाद पहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आर्याचे सातत्याने घरात कोणत्या ना कोणत्या स्पर्धकासोबत वाद होताना दिसत आहेत. 

BB Marathi Season 5  Updates :  मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनची रंगत दिवसागणिक वाढत चालली आहे. स्पर्धकांना देण्यात येणारे टास्क असो किंवा नॉमिनेशनची प्रक्रिया यावेळी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होताना दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धक आपण दुसऱ्या स्पर्धकापेक्षा किती उत्तम हे दाखवण्याचा देखील पुरेपुर प्रयत्न करत आहे. सुरुवातीलाच निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पहायला मिळाले. यानंतर स्पर्धकांना देण्यात आलेल्या बजेट टास्कवेळीही निवडलेल्या स्पर्धकांना नावे ठेवण्यात आली. अशा काही गोष्टी बिग बॉसच्या घरात प्रत्येक सीझनमध्ये घडतात. पण गेल्या काही दिवसांपासून आर्याचे कोणत्या ना कोणत्या स्पर्धकासोबत जोरदार वाद होताना दिसून येत आहेत.

आर्या आणि जान्हवीमुळे तुफान राडा 
बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यातील नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने दुसऱ्या स्पर्धकाला नॉमिनेट करत त्यामागील कारणही सांगितले. पण यानंतर बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलल्याचे दिसून आले. एका बाजूला पंढरीनाथ कांबळेला आपल्यामध्ये कोणतरी स्पाय आहे असे वाटतेय. तर दुसऱ्या बाजूला आर्या आणि जान्हवीमध्ये तुफान राडा झाल्याचे दिसून आले आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर बिग बॉसच्या घरात काय होणार याचे अपडेट्स देणाऱ्या क्लिप शेअर केल्या जातात. यामध्येच जान्हवी आणि आर्यात वाद झाल्याचे दिसून येत आहे. 

व्हिडीओमध्ये जान्हवी किचनमध्ये वैभव चव्हाण आणि अरबाज पटेलच्या बाजूला उभी असून आर्याला नॉमिनेशनच्या प्रक्रियेवरुन डिवचते. यावरुनच आर्या संतप्त होत माझ्या आड यायचे नाही असा इशारा जान्हवी किल्लेकरला देते. या दोघींमधील वाद ऐवढा टोकाला जातो की, एकमेकांना धक्काबुक्की केली जाते. ऐवढेच नव्हे दोघींमध्ये हाणामारी झाल्याचेही व्हिडीओमध्ये दिसतेय. यावर आता बिग बॉस काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

 

आर्या आणि निक्कीत शाब्दिक वाद 
बिग बॉसच्या घरात याआधी आर्या आणि नक्कीमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे दिसून आले होते. यानंतर अन्य स्पर्धकांनीही आर्याला सुनावले असता ती अधिकच भडकडली गेली. खरंतर, बिग बॉसच्या घरात शनिवारी घमासान होणार हे नक्की. याशिवाय पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनमध्ये नंबर लागणार आणि रितेश देशमुख विकेंडला कोणाला सुनावणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. 

आणखी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 च्या घरात या 16 कलाकारांची धमाकेदार एन्ट्री

बिग बॉस मराठीतील परदेसी गर्ल Irina Rudakova चे 8 ग्लॅमरस फोटोज

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?