Pushpa 2 सिनेमाचा क्लायमेक्स लीक? चाहते संतप्त होत म्हणाले डिलीट करा

Published : Jul 31, 2024, 03:41 PM ISTUpdated : Jul 31, 2024, 04:09 PM IST
allu arjun pushpa 2 release postponed

सार

Pushpa 2 Movie Climax Leaked : ‘पुष्पा-2 द रूल’ सिनेमाचा क्लायमेक्स लीक झाला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर लागला आहे. सहा सेकंदाची क्लिप पाहिल्यानंतर चाहते आता क्लायमेक्स डिलीट करा अशी मागणी करत आहेत.

Pushpa 2 Movie Climax Leaked : साउथ अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) आगामी सिनेमाचा पुष्पा 2 : द रूलचा क्लायमेक्स सीन लीक झाला आहे. यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते नाराज झाले आहेत. सहा सेकेंदाच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपला युजर्सकडून डिलीट करण्याची मागणी केली जात आहे. खरंतर, सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला पुष्पाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. रिलीजआधी सिनेमातील सस्पेंस गोष्टी समोर येऊ नयेत असे चाहत्यांना वाटते. अशातच सिनेमातील क्लायमेक्स लीक झाल्याने चाहते संतप्त झाले आहेत.

सिनेमातील फाइट सीन लीक
पुष्पा-2 सिनेमातील क्लायमेक्स सीन लीक झाला आहे. खरंतर, हा सीन फाइटिंगचा आहे. केवळ सहा सेकंदाच्या क्लिपमध्ये सिनेमाचा सेट दिसून येत असून तेथूनच व्हिडीओ लीक झाल्याचा अंदाज लावला जात आहे. व्हिडीओमध्ये रक्तबंबाळ झालेला एक व्यक्ती दिसून येत आहे.

युजर्सने दिल्यात अशा प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटनेटवरील युजरने संतप्त शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘डिलीट करा’, दुसऱ्याने म्हटले, ‘हा व्हिडीओ तुम्हाला कसा मिळाला’. याशिवाय ‘सिनेमातील सीन लीक का करत आहे’, असा सवालही एका युजरने विचारला आहे.

कधी रिलीज होणार सिनेमा?
अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण सिनेमाचे शूटिंग पूर्ण न झाल्याने निर्मात्यांनी रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे. अशातच सिनेमा 6 डिसेंबर, 2024 रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचे 500 कोटी रुपये बजेट असल्याचे सांगितले जात आहे. पुष्पा-2 सिनेमात अल्लु अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, फहाद फाजिल, जगपति बाबू आणि प्रकाश राजसारखे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

आणखी वाचा : 

रणबीर कपूरच्या Ramayan सिनेमासाठी चक्क मुंबईत अयोध्यानगरी उभी राहणार

कियारा अडवाणीचे खरं नाव बदलण्यामागील खास कारण, ऐकून व्हाल हैराण

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!