रणबीर कपूरच्या Ramayan सिनेमासाठी चक्क मुंबईत अयोध्यानगरी उभी राहणार

Published : Jul 31, 2024, 01:07 PM ISTUpdated : Jul 31, 2024, 01:14 PM IST
Ranbir Kapoor Ramayan Update

सार

Ramayan Movie Updates : रणबीर कपूरचा आगामी सिनेमा रामायणची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमासंदर्भात काही अपडेट्स समोर आले आहेत. यानुसार मुंबईत निर्मात्यांनी अयोध्येचे सेट्स उभारण्याचा विचार केला आहे.

Ramayan Movie Updates : नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. सिनेमासंदर्भातील अपडेट्स वेळोवेळी सोशल मीडियावर येत असतात. अशातच अभिनेता रणबीर कपूरचा आगामी सिनेमा रामायणबद्दलचे एक अपडेट्स समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे शूटिंग ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. यावेळी अयोध्या आणि मिथिलासंबंधीत काही सिनेमातील सीन्स शूट केले जाणार आहेत. यासाठी चक्क मुंबईत अयोध्यानगरी आणि मिथिलाची प्रतिकृती उभारण्याचा विचार केला जात आहे. यासाठी निर्मात्यांनी एक खास प्लॅनही केला आहे. या प्लॅननुसार, मुंबईत जवळजवळ 12 सेट्स तयार केले जाणार आहेत.

350 दिवस शूटिंग चालणार
मिड डे च्या रिपोर्ट्सनुसार, फिल्मचे प्रोडक्शन शेड्यूल 350 दिवसांचे आहे. यासाठी निर्मात्यांनी ब्लू प्रिंटही तयार केली आहे. यामध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक दोन्ही रुपात सीन्स शूटिंग करण्याचा प्लॅन आहे. डिसेंबर, 2025 पर्यंत रामायण सिनेमाच्या दोन्ही पार्टचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. जेणेकरुन पोस्ट-प्रोडक्शनसाठी वेळ मिळेल. याशिवाय ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 12 सेट्स उभारले जाऊ शकतात. यानंतर सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे.

रणबीरच्या रामायण सिनेमाचे बजेट
रणबीर कपूरच्या रामायण सिनेमाचे बजेट 835 कोटी रुपये आहे. सिनेमाचे दोन भाग येणार आहेत. यामध्ये रणबीर कपूर रामाची भूमिका, साई पल्लवी सीता, साउथ अभिनेता यश रावणाची भूमिका, लारा दत्ता कैकयी, अरुण गोविंद दशरथची भूमिका साकारणार आहे.

सिनेमाच्या पहिल्या भागात काय असणार?
रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या रामायण सिनेमाच्या पहिल्या भागात भगवान राम यांचे तारुण्यरुप, सीतेसोबतचा विवाह, वनवास आणि सीतेचे अपहरण पहायला मिळण्याची शक्यता आहे. खरंतर, निर्मात्यांनी अद्याप सिनेमाची अधिकृतपणे काही गोष्टींसंदर्भात घोषणा केलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, एप्रिल महिन्यापासून साई आणि रणबीरने सिनेमाचे शूटिंग सुरू केले होते. याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आणखी वाचा : 

कियारा अडवाणीचे खरं नाव बदलण्यामागील खास कारण, ऐकून व्हाल हैराण

Hardik Pandya ची मुलगा अगस्त्यच्या वाढदिवसानिमित्त भावूक पोस्ट (See Video)

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?