Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला 28 जुलैपासून कलर्स मराठीवर सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शो चे दोन प्रोमे रिलीज करण्यात आले आहेत. एका प्रोमोत सुरांचा बादशाह आणि दुसऱ्यामध्ये परदेसी गर्ल एन्ट्री करणार अशी चर्चा सुरु झालीये.
Bigg Boss Marathi Season 5 Updates : टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचे नवे पर्व सीझन 5 येत्या 28 जुलैपासून सुरु होणार आहे. अभिनेता रितेश देखमुख यंदाचे बिग बॉसच्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहे. याशिवाय सातत्याने बिग बॉस मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शो चे अपडेट्स दिले जात आहेत. अशातच आता उद्या असणाऱ्या ग्रँड प्रीमियरवेळी बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक एन्ट्री करणार याची जोरदार चर्चा आहेच. पण तत्पूर्वी शो चे दोन प्रोमो रिलीज करण्यात आले आहे.
बिग बॉस मराठी सीझन-5 चा पहिला प्रोमो
बिग बॉस मराठीचा पहिला प्रोमो शेअर करत त्याखाली एक कॅप्शन लिहिण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये ‘येतोय सुरांचा बादशाह’ असे म्हटले आहे. प्रोमोमध्ये 'राधा ही बावरी' गाणे गाणारा गायक पाठमोरा उभा असल्याचे दिसून येत आहे. अशातच प्रोमोच्या पोस्टखाली नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी प्रोमोमधील गायक अभिजित सावंत असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय अभिजित सावंतलाही पोस्टखाली कमेंट्समध्ये टॅग केले आहे. पण अद्याप अभिजितने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दुसऱ्या प्रोमोतून परदेसी गर्लची झलक
बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच एक ‘परदेसी गर्ल’ येणार असल्याची घोषणा प्रोमोमधून करण्यात आली आहे. याशिवाय प्रोमोमध्ये स्पर्धकाचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत नाहीये. पण युजर्सने कमेंट्स करत ती स्पर्धक इरा राय असणार असल्याचे म्हटले आहे.
सूत्रसंचालन करण्यास रितेश देशमुख
रितेश देखमुखने आपल्याला यंदाचा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे सूत्रसंचालन करण्यास मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. रितेशने म्हटले होते की, माझ्या आवडीचा शो असल्याने मी तो सूत्रसंचालन करणार आहे. याची उत्सुकता आहेच. शिवाय यंदाच्या सीझनमध्ये नवे बदलही स्पर्धकांना पहायला मिळणार आहेत. यामुळे कोणते नवे ट्विस्ट येणार आणि कोणता स्पर्धक कोणावर वरचढ हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
आणखी वाचा :
Bigg Boss मराठीतील 5 व्या सीझनसाठी या स्पर्धकांच्या नावांची चर्चा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापचे आणखी एक स्वप्न साकार