ब्रेकअपच्या अफवांदरम्यान मलायका-अर्जुन एकाच कार्यक्रमाला पोहोचले, पण...

Published : Jul 27, 2024, 08:32 AM IST
Malaika Arora Arjun Kapoor

सार

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने अद्याप त्यांचे ब्रेकअप झाल्याबद्दल खुलेपणाने काहीही स्पष्ट केलेले नाही. दोघेही सातत्याने क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असतात. पण एका कार्यक्रमात दोघे एकाचवेळी पोहोचले पण तेथे जे घडले ते पाहून ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलेय. 

Malika Arora and Arjun Kapoor Spot in Event : बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या मधील नाते मोडल्याच्या चर्चा गेल्या दीर्घकाळापासून सुरू आहेत. तरीही कपलने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच अर्जुन आणि मलायकाला एका इवेंटमध्ये स्पॉट करण्यात आले. पण आधीसारखे दोघेही एकमेकांसोबत नव्हे एकमेकांपासून दूर असल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतील इवेंटला पोहोचले मलायका आणि अर्जुन
मलायका आणि अर्जुन दोघेही सोशल मीडियात सातत्याने रिलेशनशिपसंदर्भातील क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असतात. नुकत्याच दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी दोघेही पोहोचले होते. यावेळी मलायका आणि अर्जुन एकमेकांसोबत दिसले नाहीत.

कार्यक्रमात एमेकांपासून विभक्त बसले
पापाराझी विरल भैय्यानी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मलायका आणि अर्जुन एका कार्यक्रमाला पोहोचल्याचे दिसून येत आहेत. पण व्हिडीओत जे काही घडतेय ते पाहून दोघांमधील ब्रेकअपच्या चर्चा अधिक झाल्या आहेत. खरंतर, आधीच्या कार्यक्रमांत दोघांना अनेकवेळा एकत्रित बसत असल्याचे दिसून येत होते. पण यावेळी चित्र काही बदललेले दिसले.

एकमेकांना केले दुर्लक्षित
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, एक फॅन अर्जुन कपूरसोबत सेल्फी घेत आहे. तेव्हाच मागून मलायका येते. गर्दी असल्याने अर्जुन मलायकाला सावरण्याचा प्रयत्न करतो. पण मलायका त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करुन पुढे जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सच्या प्रतिक्रिया
मलायका आणि अर्जुननच्या व्हिडीओतील अशा वागण्यामुळे दोघांमधील ब्रेकअप नक्कीच झाले आहे असे म्हटले जात आहे. काही युजर्स म्हणतातयत की, दोघांमधील संवाद कमी होण्यासह दूरावा स्पष्टपणे दाखवून देतोय या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. दरम्यान, कार्यक्रमावेळी अथवा कार्यक्रमानंतर दोघांनी एकमेकांशी बातचीत केली की नाही हे स्पष्ट नाही. पण तिसऱ्या युजरने म्हटले की, दोघांमधील आता सर्वकाही संपलेय असे दिसत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातील युजर्सकडून आता व्हिडीओवर दिल्या जात आहेत.

आणखी वाचा :

रेखाच नव्हे या अभिनेत्रींही अमिताभ बच्चन यांच्यावर होत्या फिदा

पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमकडून Shah Rukh Khan चा सन्मान, जारी केली सोन्याची नाणी

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?