Bigg Boss 18 च्या घरातील पहिल्या स्पर्धकाचे नाव आले समोर, या दिवशी सुरू होणार शो

Published : Jul 24, 2024, 12:09 PM ISTUpdated : Jul 24, 2024, 12:10 PM IST
Bigg Boss 18 Update

सार

Bigg Boss 18 Update : बिग बॉस ओटीटी-3 सह आता बिग बॉसच्या 18 व्या सीझनची चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस यंदा ऑक्टोंबर महिन्यात सुरू होणार आहे. एवढेच नव्हे शो मधील पहिल्या स्पर्धकाचे नावही समोर आले आहे. 

Bigg Boss Season 18 Update : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या बिग बॉसचा तिसरा सीझन सुरू आहे. अशातच फिनालेच्या दिशेने पुढे जात असून सीझनमधील अंतिम स्पर्धक कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अशातच बिग बॉसच्या 18 व्या सीझनबद्दल एक अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 18 येत्या 5 ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. खरंतर, टेलिव्हिजन अभिनेता शोएब इब्राहिम पहिला स्पर्धक असल्याची चर्चा असून यावर त्याच्या नावावर निर्मात्यांनी अधिकृतपणे काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.

कधीपासून सुरू होणार बिस बॉस 18?
बिग बॉसच्या 18 व्या सीझनच्या ताज्या अपडेट्सनुसार, येत्या 5 ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. निर्मात्यांनी सीझनसाठी तयारीही सुरू केल आहे. शोएब इब्राहिमचे (Shoaib Ibrahim) नाव पहिल्या स्पर्धकाच्या रुपात समोर आले आहे. याशिवाय लवकरच अन्य स्पर्धकांची नावेही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शोएबची पत्नी दीपिका कक्कड़ देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून झळकली होती.

कोण आहे शोएब इब्राहिम
शोएब इब्राहिमबद्दल बोलायचे झाल्यास ते एक टेलिव्हिजन अभिनेता आहे. शोएबने टेलिव्हिजनवरील काही मालिकांमध्ये काम केले आहे. 'ससुराल सिमर का' मालिकेतून शोएबला ओखळ मिळाली. या मालिकेत शोएबची पत्नी दीपिकाही मुख्य भूमिकेत झळकली होती. याशिवाय शोएब डान्स रिअ‍ॅलिटी शो 'झलक दिखला जा' मध्येही झळकला होता. (Bigg Boss 18 season che updates) 

बिग बॉस 18 सीझनचे सूत्रसंचालन कोण करणार?
बिग बॉस 18 च्या सीझनचे सूत्रसंचालन सलमान खान करणार का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. खरंतर, सलमान खानचे सूत्रसंचालन प्रेक्षकांच्या नेहमीच पसंत पडते. याबद्दलही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Bigg Boss OTT-3 फिनाले
रिअ‍ॅलिटी शो असणाऱ्या बिग बॉस ओटीटी-3 च्या फिनालेची तयारी निर्मात्यांकडून केली जात आहे. या शो चे फिनाले येत्या 4 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. बिग बॉस ओटीटी-3 मधील टॉप-5 स्पर्धकांमध्ये सना मकबूल, अरमान मलिक, रणवीर शौरी, लव कटारिया आणि विशाल पांडे यांची नावे समोर येत आहेत.

आणखी वाचा : 

मला पळून जाऊन लग्न करायचे होते...सोनाक्षीसोबतच्या लग्नावर जहीरची प्रतिक्रिया

धर्मवीर-2 च्या ट्रेलर लाँचवेळी सलमान-गोविंदाची 17 वर्षानंतर एकाच स्टेजवर गळाभेट

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?