'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापचे आणखी एक स्वप्न साकार
Entertainment Jul 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्विकचे स्वप्न
महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या पृथ्विकने आयुष्यातील स्वप्नांची एक लिस्ट तयार केली आहे. याच लिस्टमधील आणखी एक स्वप्न पृथ्विकचे साकार झाले आहे.
Image credits: Instagram
Marathi
पृथ्विकने खरेदी केली नवी कार
पृथ्विक प्रतापने नवी कार खरेदी केल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. खरंतर, दुसरे स्वप्नपूर्ती झाल्याचे म्हणत एक खास पोस्टही शेअर केलीय.
Image credits: Instagram
Marathi
पृथ्विकची इंस्टाग्रामवरील पोस्ट
पृथ्विकने इंस्टाग्राम पोस्टमध्ये ‘पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या’ असे म्हटले आहे.
Image credits: Instagram
Marathi
पृथ्विकची KIA कार
पृथ्विकने किया कार खरेदी करत पोस्टमध्ये पुढे म्हटले, ‘First is always precious म्हणून Siri please play ‘आले तूफान किती…’ असे म्हटले आहे.
Image credits: Instagram
Marathi
चाहत्यांकडून पृथ्विकचे अभिनंदन
पृथ्विक प्रतापने नवी कोरी कार खरेदी केल्यानंतर चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Image credits: Instagram
Marathi
पृथ्विकचे पहिले स्वप्न
पृथ्विकने नवी कार खरेदी करण्याआधी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. याचे काही फोटोही पृथ्विकने सोशल मीडियात शेअर केले होते.
Image credits: Instagram
Marathi
पृथ्विकच्या कामाबद्दल
पृथ्विक प्रतापने 'क्लास ऑफ'83', 'डिलिव्हरी बॉय' आणि 'ममता चाइल्ड फॅक्टरी' अशा सिनेमांमध्ये काम केले आहे.