Bigg Boss मराठीतील 5 व्या सीझनसाठी या स्पर्धकांच्या नावांची चर्चा
Entertainment Jul 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
बिग बॉस मराठी सीझन- 5
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड प्रीमियमर 28 जुलैला रात्री 9 वाजता असणार आहे. यंदाच्या सीझन नव्या रुपात आणि ट्विस्टमध्ये पहायला मिळणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
सूत्रसंचालन कोण करणार?
मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचे सूत्रसंचालन रितेशन देशमुखकडून केले जाणार आहे. आवडीचा शो होस्ट करायला मिळणार असल्याने रितेश अधिक उत्सुकही आहे.
Image credits: Instagram
Marathi
स्पर्धकांच्या नावाची चर्चा
यंदाच्या सीझनचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणाऱ्या स्पर्धकांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यासाठी काही नावेही घेतली जात आहेत.
Image credits: Instagram
Marathi
विवेक सांगळे
स्टार प्रवाह चॅनलवरील देवयानी मालिकेतून झळकलेला अभिनेता विवेक सांगळे बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.
Image credits: Instagram
Marathi
वर्षा उसगांवकर
मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात एण्ट्री करण्याची शक्यता आहे.
Image credits: Instagram
Marathi
चेतन वनडेरे
‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘फुलपाखरू’ मालिकांमधून झळकलेला अभिनेता चेतन वनडेरे यंदाच्या सीझनमध्ये घरात एण्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.
Image credits: Instagram
Marathi
सोशल मीडिया इंफ्लुएन्सर अंकिता वालावकर
कोकण हार्टेड गर्ल नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी अंकिता वालावरकरच्या नावाची चर्चा आहे. अंकिता बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.