अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगसाठी रिहाना दाखल, पण पॉप सिंगरचे लगेज पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

Published : Mar 01, 2024, 05:04 PM IST
Rihanna International Pop Star,

सार

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन आजपासून गुजरातमधील जामनगर येथे सुरू होणार आहे. यानिमित्त हॉलिवूडची पॉप सिंगर रिहाना परफॉर्म करणार आहे. पण रिहानाचे लगेच पाहुन नेटकरी हैराण झाले आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : हॉलिवूडमधील पॉप सिंग रिहाना मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी भारतात आली आहे. जामनगरमध्ये रिहाना पोहोचलीच पण तिच्या लगेचने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होच आहे. लगेजमध्ये सूटकेस नव्हे तर मोठे-मोठे कार्टन्स दिसून येत आहेत. यावरच आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

रिहानाच्या लगेजवर नेटकऱ्यांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया
रिहानाच्या लगेजचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आता प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. एका युजर्सने लिहिले की, लगेज कोणत्या मार्गाने येथवर आणले आहे? दुसऱ्याने लिहिले की, ती नक्की कोणता लहंगा कॅरी करतेय? तिसऱ्याने लिहिले की, ती संपूर्ण स्टेज सोबत घेऊन जात नाहीय. खरंतर ती दोन मुलांची आई असल्याने सर्वकाही सोबत घेऊन आलीय.

रिहानाने दिले मजेशीर उत्तर
रिहानाने लगेजबद्दल एकाने प्रश्न विचारला की, तिने आपल्यासोबत फोल्डिंग घर आणलेय का? यावर रिहानाने उत्तर देत म्हटले की, “स्टेज माझ्या कॅरिऑनमध्ये बसू शकत नाही.”

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगसाठी रिहानाने घेतलीय ऐवढी फी
रिहाना 29 फेब्रुवारीलाच जामनगरमध्ये दाखल झाली आहे. असे सांगितले जातेय की, रिहाना 1 मार्चला होणाऱ्या कॉकटेल पार्टीत परफॉर्म करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रिहाना परफॉर्म करण्यासाठी जवळजवळ 5 मिलियन म्हणजेच 41.4 कोटी रुपये फी घेणार आहे. रिहाना या कार्यक्रम सोहळ्यात 'All Of The Lights', 'Right Now', 'Wild Thoughts', 'Stay' आणि 'Love On The Brain' सारखी गाणी गाणार आहे.

आणखी वाचा : 

श्वेता तिवारीला मिळाला नवा पार्टनर? सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चा

हळद ते मेंदीसाठी इशा अंबानीसारखे हे लहंगे देतील तुम्हाला स्टायलिश लुक

दीपिका आणि रणवीरच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या बाळाचे आगमन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कपलने दिली आनंदाची बातमी

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!