Pankaj Udhas : "चांदी जैसा रंग है तेरा" गाणाऱ्या पंकज उधास यांना पहिल्या गायनासाठी बक्षीस म्हणून मिळाले होते 51 रुपये

"चांदी जैसा रंग है तेरा" सारखी प्रसिद्ध गाणाऱ्या पंकज उधास यांनी आपल्या करियरची सुरुवात मोठ्या भावासोबत केली होती. पंकज यांनी दीर्घकाळ इंडस्ट्रीला आपली भुरळ पाडली होती.

Chanda Mandavkar | Published : Feb 26, 2024 11:22 AM IST / Updated: Feb 26 2024, 05:03 PM IST

Pankaj Udhas Life Journey :  'चांदी जैसा रंग है तेरा', 'रिश्ता तेरा मेरा', 'न कजरे की धार', 'मत कर इतना गुरूर', 'आदमी खिलौना है' ते 'जीए तो जीए कैसे' सारखी सुपरहिट गाणी पंकज उधास यांनी इंडस्ट्रीला दिली. या गाण्यांच्या माध्यमातून पंकज उधास यांना खूप प्रसिद्धी मिळाली. पण तुम्हाला माहितेय का, पंकज उधास यांना पहिल्यांदा गाणे गायल्यानंतर बक्षीस म्हणून 51 रुपये देण्यात आले होते.

पंकज उधास यांचा जन्म गुजरातमधील जेतपुर येथे झाला होता. त्यांना तीन भाऊ होते त्यापैकी ते सर्वात लहान भाऊ होते. पंकज उधास यांचा भाऊ मनहर उधास बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर होते. 'राम लखन' सिनेमामधील 'तेरा नाम लिया', 'हीरो' सिनेमातील 'तू मेरा हीरो है' 'जान' सिनेमातील 'जान ओ मेरी जान' अशी काही सुपरहिट गाणी पंकज उधास यांच्या भावाने गायली आहेत.

पंकज उधास यांचे बालपण
पंकज उधास राजकोट जवळील चरखडी गावात वाढले. त्यांचे आजोबा गावातील पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. याशिवाय पंकज उधास यांचे वडील शासकीय नोकरी करायचे. अशाप्रकारे पंकज यांचा संपूर्ण परिवार शिकलेला आणि गावातील श्रीमंत परिवारांपैकी एक होता.

वयाच्या सातव्या वर्षापासून गायनाला केली सुरुवात
पंकज उधास यांनी बालपणापासून संगीत क्षेत्राशी जोडले गेले. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. सुरुवातीला पंकज हे आवड म्हणून गायचे. पण भावाने त्यांच्यामधील ही कला ओखळली आणि त्यांना गायनासाठी प्रोत्साहन दिले. याशिवाय पंकज उधास यांना त्यांचा भाऊ कार्यक्रमासाठी घेऊन जायचा.

भावामुळे इंडस्ट्रीत ठेवले पाऊल
पहिल्यांदा पंकज उधास यांनी भावासोबत एका कार्यक्रमात गाणे गायले होते. हा काळ तो होता जेव्हा भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू होते. त्यांनी ‘ऐ वतन के लोगों’ गाणे गायले आणि प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. यासाठी पंकज उधास यांना बक्षीस म्हणून 51 रुपये मिळाले होते. यानंतर पंकज उधास यांनी गायन आणि गझलच्या जगात पाऊल ठेवले.

पंकज उधास यांचे निधन
सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे सोमवारी (26 फेब्रुवारी) निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते. पंकज यांची मुलगी नायाब उधास यांनी वडीलांच्या निधनाची बातमी दिली. नायाबने एक पोस्ट शेअर करत म्हटले की, “सांगताना अत्यंत दु:ख होतेय पद्मश्री पुरस्कारकर्ते पंकज उधास यांचे आज निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते.”

आणखी वाचा : 

Pankaj Udhas : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन

5 सिनेमे, 3 लग्न आणि 225 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हा TV अभिनेता

Ruturaj Singh Died : टेलिव्हिजनवरील 'अनुपमा' मालिकेतील स्टार ऋतुराज सिंह यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन

Share this article