Pakistan Election : पाकिस्तानातील निवडणूकीआधी बलूचिस्तान येथे बॉम्बस्फोट, 20 हून अधिक जणांचा मृत्यू

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ एक दिवश शिल्लक आहे. याआधीच पाकिस्तानातील बलूचिस्तान येथे बॉम्बस्फोट घडल्याची घटना घडली आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 7, 2024 12:24 PM IST / Updated: Feb 07 2024, 06:00 PM IST

Balochistan Bomb Blast : पाकिस्तानात 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूका होणार आहे. याआधीच आज (7 फेब्रुवारी) बलूचिस्तान प्रांतात एका अपक्ष उमेदवाराच्या कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. प्रांतातील सरकारच्या अधिकाऱ्यांनुसार, बॉम्ब स्फोटात कमीतकमी 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून खूपजण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, बॉम्बस्फोटाची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही.

पहिला बॉम्बस्फोट पिशिन जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार असफंदयार खान यांच्या कार्यालयाबाहेर झाला. या स्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. दुसरा बॉम्ब स्फोट अफगाण सीमेजवळ झाला आहे. या स्फोटात 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. 

मौलाना अब्दुल वासे यांचे कार्यालय होते निशाण्यावर
बॉम्बस्फोट करण्यासाठी मौलाना अब्दुल वासे यांचे कार्यालय निशाण्यावर होते. खरंतर अब्दुल वासे यांचा एक धार्मिक पक्ष आहे. दरम्यान, या पक्षाला बहुतांशवेळा दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला आहे.

पाकिस्तानातील निवडणूक आयोगाना मागितला घटनेचा रिपोर्ट
निवडणूक आयोगातील एका प्रवक्त्याने म्हटले की, निवडणूक आयोगाने बलूचिस्तानमधील मुख्य सचिव आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे घटनेचा तत्काळ रिपोर्ट मागितला आहे. या घटनेमधील व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बॉम्ब स्फोटासाठी IED चा वापर
बलूचिस्तानमधील कार्यवाह माहिती मंत्री जान अचकजई (Jan Achakzai) यांनी ARY वृत्तसंस्थेला सांगितले की, पिशिनमध्ये बॉम्बस्फोट एका मोटरसायकलला लावण्यात आलेल्या आयईडी स्फोटकांमुळे झाला होता. दुसऱ्या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, बॉम्ब स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

आणखी वाचा : 

VIDEO : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला, पत्नीने परराष्ट्र मंत्र्यांना मदतीसाठी लिहिले पत्र

किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचे निदान झाल्याची बॅकिंघम पॅलेसची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृती सुधारण्यासाठी केली प्रार्थना

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया

Share this article