जम्मू-काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता याना मीर हिने युकेमधील संसदेत भारताविरोधात अपप्रचार करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यानाने म्हटले की, "मी मलाला नाही, भारतात मी स्वतंत्र आहे."
Yana Mir Viral Video : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता याना मीरने युकेमधील (UK) संसदेत धडाकेबाज भाषण दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युकेच्या संसदेत याना मीरला डायव्हर्सिटी अॅम्बेसेडर पुरस्काराने गौरविण्यात आले. यादरम्यान, मीरने जम्मू आणि काश्मीरच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अपप्रचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे. तिने म्हटले की, “मी मलाला युसुफजाई (Malala Yousafzai) नाही.” खरंतर, मलाला नोबेल शांति पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ती मूळची पाकिस्तानी असून तिने युकेमध्ये आश्रय घेतला आहे.
जम्मू अॅण्ड काश्मीर स्टडी सेंटर युकेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मीरने म्हटले की, “मी मलाला युसुफजाई नाही. कारण मी माझी मातृभूमी काश्मीरमध्ये स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. हा भारताचाच हिस्सा आहे. मी कधीच माझ्या मातृभूमीमधून पळून युकेमध्ये आश्रयास येणार नाही. मी कधीच युसूफजई होऊ शकत नाही.”
मीरच्या व्हिडीओला सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला असून त्याला एक दशलक्षाहून अधिक युजर्सने पाहिले आहे. मीरला युकेच्या खासदार थेरेसा विलियर्स यांनी डायव्हर्सिटी अॅम्बेसेडर पुरस्काराने गौरविले. यादरम्यान संसदेत बॉब ब्लॅकमॅन आणि वीरेंद्र शर्मा उपस्थितीत होते. अनुपम खेर यांच्यासह अन्य काहींनी मीरला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा :
US On Moon : अमेरिकेने 50 वर्षानंतर पुन्हा रचला इतिहास, ठेवले चंद्रावर यशस्वीपणे पाऊल
एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्टमधून खुलासा
BAPS Hindu Mandir : अबू धाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन