अमेरिकेने 50 वर्षानंतर पुन्हा चंद्रावर यशस्वी मोहीम केली आहे. या मोहीमेतील यान एका खासगी कंपनीने तयार केले होते.
US On Moon : अमेरिकेने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्यांनी 50 वर्षांनंतर पुन्हा चंद्रावर यशस्वी मोहीम केली आहे. अमेरिकेने भारतीय वेळेनुसार शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी ओडिसियस ( Odysseus) नावाचे लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवले आहे.
ओडिसियस लँडर सहा पायांचा एक लहान रोबोट लँडर आहे. दक्षिण ध्रुवाजवळ जेथे ओडिसियस लँडर उतरवण्यात आले आहे त्याला IM-1 नावानेही ओखळले जाते. हा चंद्राचा तो हिस्सा आहे जेथे भारताने चांद्रयान 3 मोहीमेतील विक्रम लँडर उतरवला होता. हे पहिल्यांचा होतेय की, वर्ष 1972 नंतर अमेरिकेला एखादे यान चंद्रावर उतरवण्यासाठी यश मिळाले आहे.
दरम्यान, लँडिंगआधी इंट्युएटिव्ह मशीनच्या ओडिसियस लँडरच्या नेव्हिगेशन सेंसरमध्ये बिघाड झाला होता. या यानाला एका खासगी कंपनीने तयार केले होते. पण यानाचा सर्व खर्च नासाने केला होता. मानवी इतिहासात आज पहिल्यांदा असे झालेय की, एखादे खासगी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आले आहे. याचे नेतृत्व अमेरिकेने केले आहे.
आणखी वाचा :
एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्टमधून खुलासा
BAPS Hindu Mandir : अबू धाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन