अमेरिकेतील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील तरुणाच्या नाकातून डॉक्टरांनी चक्क 150 जिवंत किडे काढले आहेत.
US : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील अत्यंत हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील तरुणाच्या नाकातून रक्त येण्यासह डोकेदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तरुणाचे नाक तपासून पाहिले आणि सोनोग्राफी केल्यानंतर समोर आलेले रिपोर्ट्स पाहून डॉक्टरही हैराण झाले. खरंतर तरुणाच्या नाकात किडे झाले होते आणि ते जिवंत होते. लहान-लहान किड्यांनी तरुणाच्या नाकात घर केले होते. डॉक्टरांनी तरुणाच्या नाकाचे ऑपरेशन करुन किडे बाहेर काढले आहेत.
नक्की काय घडले?
डॉक्टरांनी सांगितले की, ज्यावेळी तरुण उपचारासाठी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्याला पूर्णपणे सूज आली होती. त्याला खूप वेदना होत होत्या. नाकातून सातत्याने रक्त वाहत होते. दीर्घकाळापासून तो या समस्येचा सामना करत होता. पण त्याला कळत नव्हते नक्की काय झालेय. दुखण्यापासून आराम मिळावा म्हणून तरुण सातत्याने पेन किलरच्या गोळ्यांचे सेवन करायचा. यामुळे तरुणाची प्रकृती बिघडली गेली. अशातच तरुण उपचारासाठी एचसीए फ्लोरिडा मेमोरियल रुग्णालयात आला. येथील डॉक्टरांनी तरुणाचे नाक तपासून पाहिले असता त्यांना धक्का बसला.
नाकात झाले होते किडे
डॉक्टरांच्या मते, तरुणाच्या नाकाची चाचणी करण्यात आली तेव्हा असंख्य प्रमाणात नाकात किडे असल्याचे समोर आले. तरुणाची प्रकृती नाजूक झाली होती. खरंतर, किडे तरुणाच्या नाकातील मांस खाऊन जिवंत राहत होते. असे काही दिवस सुरू राहिले असते तर तरुणाला आपले डोळे गमवावे लागले असते.
डॉक्टरांनी यशस्वीपणे केले ऑपरेशन
डॉक्टरांनी सर्वप्रथम तरुणाच्या नाकातील किडे स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. पण असंख्य प्रमाणात किडे असल्याने ते स्वच्छ करणे मुश्किल होते. अशातच डॉक्टरांनी तरुणाच्या नाकाची सर्जरी केली. नाकातून सर्जरी करताना 150 जीवंत किडे बाहेर काढले. आता तरुणाला डिस्चार्च दिला असून तो व्यवस्थितीत आहे. डॉक्टरांनी आम्ही पहिल्यांदाच अशा प्रकारचे ऑपरेशन केल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा :
US On Moon : अमेरिकेने 50 वर्षानंतर पुन्हा रचला इतिहास, ठेवले चंद्रावर यशस्वीपणे पाऊल
एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्टमधून खुलासा