Canada : विमान उड्डाणाआधीच प्रवाशाने केबिनचा दरवाजा उघडत मारली उडी, व्यक्ती जखमी

Published : Jan 11, 2024, 10:36 AM ISTUpdated : Jan 11, 2024, 11:12 AM IST
Air Canada

सार

एअर कॅनडाच्या विमानातील एका प्रवाशाने केबिनचा दरवाजा उघडून 20 फूट उंचीवर विमानातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील व्यक्तीला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Canada : एअर कॅनडाचे विमान दुबईच्या (Dubai) दिशेने जाण्यासाठी उड्डाण करणार होते. यादरम्यान प्रवाशाने विमानातून उडी मारल्याचा प्रकार घडला. ही घटना 8 जानेवारीची असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवासी टोरंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानात चढला. पण नंतर आपल्या सीटवर बसण्याऐवजी प्रवाशाने केबिनचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली.

विमानाचा दरवाजा उघडून प्रवाशाने मारली उडी
प्रवाशाने 20 फूट उंचीवरून खाली उडी मारल्याने त्याला दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. एअर कॅनाडाच्या वेबसाइटनुसार, या घटनेच्या कारणास्तव बोइंग 747 विमानाला उड्डाणासाठी सहा तास उशीर झाला.

एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. सर्व प्रक्रियांचे पालन केले जात आहे. याशिवाय प्रवाशाला गंभीर दुखापत झालीय का याची माहिती देखील समोर आलेली नाही. सध्या हे देखील स्पष्ट झालेले नाही की, प्रवाशाच्या अशा वागणूकीमुळे त्याला अटक करण्यात आली आहे की नाही.

16 वर्षीय प्रवाशाने केला होता एका परिवारावर हल्ला
या घटनेच्या काही दिवसआधी एका 16 वर्षीय प्रवाशाने एअर कॅनाडाच्या विमानातील एका परिवारावर हल्ला केला होता. या घटनेमुळे अन्य प्रवाशांना विमान उड्डाणासाठी तीन तासांची वाट पाहावी लागली होती. रॉयल कॅनेडियन पोलिसांनी सांगितले होते की, ज्यावेळी विमान टोरंटो (Toronto) येथून कॅलगरी (Calgary) येथे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळी ही घटना घडली.

अधिकाऱ्यांनी म्हटले होते की, 16 वर्षीय प्रवाशाने अन्य प्रवाशांसह स्टाफला परिवारावर हल्ला करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय हल्ला केलेल्या परिवारातील सदस्यांना दुखापतही झाली होती. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.

आणखी वाचा : 

India-Maldives Row : भारताशी पंगा घेतल्यानंतर मालदीवमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची खुर्ची धोक्यात

अलास्का एअरलाइन्स विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानाच्या खिडकीची काच हवेतच निघाल्याचा पाहा धक्कादायक VIDEO

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

PREV

Recommended Stories

गोळीबार करणाऱ्या मुस्लिम हल्लेखोराला निशस्त्र हातांनी पकडले, अहमद ठरला ऑस्ट्रेलियाचा हिरो!
Sydney Attack : ज्यू समुदायावर गोळीबार करणारा नवीद अकरम नक्की कोण? ड्रायव्हिंग लायसन्सने उघड झाली ओळख!