गॅब्रिएल अटल ठरले जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे सर्वात तरुण PM म्हणून सांभाळतील कार्यभार

Gabriel Attal : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी नवीन पंतप्रधानांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनुसार गॅब्रिएल अटल हे जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत.

Gabriel Attal : गॅब्रिएल अटल यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी गॅब्रिएल अटल यांना फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित केले आहे. गॅब्रिएल अटल हे जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत.

यापूर्वी फ्रान्स सरकारमध्ये गॅब्रिएल अटल हे शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत होते. 34 वर्षांचे गॅब्रिएल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. सोमवारी रात्री उशीरा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एलिझाबेथ बॉर्न यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा स्वीकारला. यानंतर 62 वर्षीय एलिझाबेथ यांच्या जागी मॅक्रॉन यांनी गॅब्रिएल अटल यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.

एलिझाबेथ बॉर्न यांनी राजीनामा देण्याचे नेमके कारण काय?

एलिझाबेथ बॉर्न यांच्या राजीनाम्याचे कारण नवीन इमिग्रेशन कायद्याबाबत वाढता राजकीय तणाव असल्याचे म्हटले जात आहे. या कायद्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी समर्थन केले होते. 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांची वर्ष 2022 मे महिन्यामध्ये फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे त्यांनी देशाच्या पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. त्या फ्रान्समधील दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या.

आणखी वाचा :

Watch Video: भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना शिकवला धडा, सुरक्षितरित्या हायजॅक झालेल्या जहाजाची केली सुटका

Argentina President Javier Milei : अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्टेजवरच गर्लफ्रेंडचे चुंबन घेतले, VIDEO VIRAL

विमानात गर्भवतीसोबत सीट बदलण्यास त्याने दिला नकार, टीकेऐवजी नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा

Share this article