२०२६ मध्ये फॅमिलीसाठी कारचे पर्याय घ्या जाणून, हि गाडी राहील बेस्ट

Published : Dec 27, 2025, 02:29 PM IST

भारतात कमी किमतीत उपलब्ध असलेल्या फॅमिली कार्सबद्दल या लेखात माहिती दिली आहे. यामध्ये टाटा टिगोर आणि ह्युंदाई ऑरा या दोन लोकप्रिय मॉडेल्सचा समावेश आहे, ज्यांच्या किंमती, मायलेज आणि पेट्रोल-सीएनजी पर्यायांची चर्चा केली आहे. 

PREV
16
२०२६ मध्ये फॅमिलीसाठी कारचे पर्याय घ्या जाणून, हि गाडी राहील बेस्ट

भारतात आता कारच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. कारच्या किंमती कमी झाल्यामुळं आपण प्रवास, आरामदायक आणि स्मूथ ड्रायव्हिंगसाठी चांगली गाडी खरेदी करू शकता.

26
TATA Tigor

आपण टाटा कंपनीची टाटा Tigor गाडी खरेदी करू शकता. हि गाडी आपल्याला अतिशय कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळेल. या कारची एक्स शोरूम किंमत हि ५.४९ लाखांपासून सुरु होते. हि कार पेट्रोल आणि सीएनजी दोनही प्रकारात आपण घेऊ शकता.

36
गाडीला किती मिळणार मायलेज?

पेट्रोल व्हेरियंटमध्ये १९.२ किमी मायलेज देत असते. सीएनजी व्हेरियंटमध्ये २६ किलोमीटर मायलेज देत असते. सेफ्टीचा विचार केला तर हि Tigor गाडी चांगली मजबूत आहे. या गाडीची सेक्युरिटी टॉपची आहे.

46
Hyundai Aura

दक्षिण कोरियन कंपनी ह्युंडाई कंपनीची ऑरा हि गाडी मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या गाडीची किंमत ५.९८ लाख रुपये असून ती पेट्रोल आणि सीएनजी दोनही पर्यायात आपण खरेदी करू शकता.

56
गाडी किती देणार मायलेज?

हि गाडी चांगलं मायलेज देते. कंपनीकडून गाडीला पेट्रोलसाठी २० आणि डिझेलसाठी २५ किलोमीटर ऍव्हरेज देण्यात आलं आहे. या कारमध्ये सगळ्या सिस्टीम देण्यात आल्या आहेत.

66
गाडीमध्ये काय स्पेसिफिकेशन?

गाडीमध्ये टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग क्रूझ कंट्रोल आणि शानदार सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळं आपण हि गाडी खरेदी केल्यावर आपल्याला तिचा फायदाच होणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories