आवळा तेल नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. हे तेल लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात. हिवाळ्यात हे तेल लावल्याने केस कोरडे होत नाहीत. केसांच्या मुळांना सुंदर बनवते. केसांना मॉइश्चराइझ देखील ठेवते. इतकेच नाही, तर या तेलाने डोक्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे केसांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात. केस गळणे देखील कमी होते.
हे आवळ्याचे तेल नियमितपणे केसांना लावल्याने अनेक फायदे होतात.
पांढऱ्या केसांची समस्या कमी करते..
आजकाल अनेकजण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. हे आवळ्याचे तेल वापरल्यास ती समस्या दूर होते. आवळ्याचे तेल केसांच्या मुळांमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या कमी होते. केस काळे आणि चमकदार बनवते.
नैसर्गिक कंडिशनर:
आवळ्यातील फॅटी ऍसिडस् केस मऊ करतात. हिवाळ्यात शॅम्पू वापरल्यानंतर केस कोरडे होऊ नयेत म्हणून तुम्ही आंघोळीपूर्वी हे तेल वापरू शकता.
केसांची घनता वाढवते:
केस दाट वाढवण्यासाठीही हे तेल खूप मदत करते. हे केस गळणे कमी करते आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, तुम्हाला केस दाट झालेले दिसतील.
कोंड्याच्या समस्येवर उपाय:
हिवाळ्यात टाळू कोरडी झाल्यामुळे किंवा जास्त तेलकटपणामुळे कोंडा होतो. आवळ्याचे तेल टाळू स्वच्छ करते आणि अतिरिक्त तेल काढून टाकते. कोंडा नियंत्रित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
केसांना मजबूत करते:
हे केसांना गमावलेले प्रोटीन परत देऊन केस गळणे कमी करते. केसांना मुळांपासून टोकांपर्यंत मजबूत करते.