Anant-Radhika Shubha Ashirwad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरु असलेल्या अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. यावेळी राधिकाने नरेंद्र मोदींचे आशीर्वादही घेतले.
Anant-Radhika Shubha Ashirwad : जगप्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा 12 जुलैला पार पडला. आज (13 जुलै) कपलच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सध्या अंबानी आणि मर्चेंट परिवाराच्या सोहळ्याला देश-विदेशातून राजकीय नेतेमंडळींनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले आहेत.
अंबानी परिवाराकडून पंतप्रधानांचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी वधू-वर यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. पंतप्रधानांनी सोहळ्यातील हॉलमध्ये एण्ट्री केली असता तेव्हा हरे रामा...हरे कृष्णा भजन सुरु होते. याशिवाय पंतप्रधानांचा मान राखण्यासाठी सर्व पाहुण्यांनी खुर्चीवरुन उठून उभे राहित त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एण्ट्री करताच त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक देखील दिसले. यानंतर अनंत-राधिकाला भेटण्यासाठी पंतप्रधान गेले असता दोघांनी त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान पाहुण्यांची भेट घेत पुढे आले…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोहळ्यावेळी पाहुण्यांची भेट घेत अनंत-राधिकाला भेटण्यासाठी गेले. अनंतने पंतप्रधानांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. यानंतर राधिकानेही मोदींचे चरणस्पर्श केले. राधिकानंतर मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीने देखील पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले. वर-वधुची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी हात जोडून सोहळ्याला उपस्थितीत राहिलेल्या मंडळींना नमस्कार केला आणि भजन ऐकण्यासाठी बसले.
माजी राष्ट्रापती रामनाथ कोविंदही सोहळ्याला उपस्थितीत
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील शनिवारी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले. कोविंद यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटला आशीर्वाद दिले. या सोहळ्यासाठी कोविंद परिवारासोबत आले होते. याशिवाय आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि सुपरस्टार राम चरणही अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला आले होते.
आणखी वाचा :
मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन