Mumbai Heavy Rain News : पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडणार, हवामान विभागाने दिला इशारा

Mumbai Heavy Rain News : मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jul 13, 2024 7:13 AM IST

Mumbai Heavy Rain News : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे खाली 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. मागील अर्धा तासापासून पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात देखील झालीय. याचा वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अंधेर सबवे खाली तीन चार फुट पाणी साचले आहे. त्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने शनिवारी मुंबईसह ठाणे आणि पालघरला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील इतर भागातही पडणार जोरदार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता शनिवारी हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर शनिवारी संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

येत्या 72 तासात देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

येत्या 72 तासात देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 13 ते 15 जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, सिक्कीम, बिहारमध्ये पाऊस पडू शकतो.

आणखी वाचा : 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार मुंबईला हजारो कोटींची भेट, ते कोणत्या योजनांचे करणार उदघाटन?

Share this article