मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

Published : Jul 13, 2024, 07:31 PM IST
Narendra Modi Austria Visit

सार

उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली.

मुंबई : लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून तब्बल 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी, पंतप्रधानांनी मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचे म्हटले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न असल्याचं मोदींनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी भाषणात लाडकी बहीण योजनेचा केला उल्लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी आवर्जून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे म्हटले.

‘मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार’

पुढे बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटले की, महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. येथील 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे. मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा लोकांनी आमचे स्वागत केले आहे, एनडीए सरकारचे स्थिरता देऊ शकते हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पटीने अधिक काम करणार आहे.

महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझं स्वप्न आहे.

आणखी वाचा :

Mumbai Heavy Rain News : पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडणार, हवामान विभागाने दिला इशारा

Aanandacha Shidha News : गणेशोत्सवानिमित्त सरकारकडून 'या' दिवशी मिळणार आनंदाचा शिधा, 562 कोटींचा खर्च

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!