Mumbai Rains : मुंबईसह कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांसाठी हायअलर्ट जारी

Published : Jul 25, 2025, 08:40 AM IST

मुंबईसह कोकणातील भागात पुढील 24 तासात पावसाचा जोर अधिक वाढून अतिमुसळधार पावसाची शक्यता हवमान खात्याने वर्तवण्यात आली आहे. अशातच नागरिकांसाठी हायअलर्ट जारी केला आहे. 

PREV
15
पावसाचा अंदाज

राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरलाय. आज, २५ जुलै रोजीही, हवामान खात्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणातल्या अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विशेषतः सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

25
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर

मुंबईत आज काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असल्यामुळे घराबाहेर केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा, असा सल्ला दिला जातोय. पावसामुळे खड्डे, पाणथळ रस्ते, आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. आजचं मुंबईतलं तापमान २४ अंश ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे.

35
ठाणे आणि नवी मुंबईतही जोरदार पावसाचा अंदाज

ठाणे आणि नवी मुंबई परिसरातसुद्धा गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आजही हवामान खात्याने या भागात ऑरेंज अलर्ट दिलाय. जोरदार पावसामुळे नाले भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे सांडपाण्याच्या व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. स्थानिक प्रशासन सतर्क असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.

45
कोकणात रेड अलर्टची स्थिती

कोकणातले रायगड आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे आज रेड अलर्टवर आहेत. म्हणजेच अतिमुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. पावसामुळे नद्या, ओढे, आणि डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचाही धोका निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय.

55
पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम

गेल्या ३-४ दिवसांपासून पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. आजही पावसाची तीव्रता कमी होण्याची चिन्हं नाहीत. हवामान विभागाने पालघरसाठी यलो अलर्ट दिलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आणि आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Read more Photos on

Recommended Stories