Dahi Handi 2025 : जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा थरार, 10 थरांची सलामी देत मोडला विश्वविक्रम (See Photos)

Published : Aug 16, 2025, 03:09 PM IST

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडीच्या उत्सवात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने यंदा 10 थरांचा मानवी मनोरा रचत विश्वक्रम केला आहे. याचा उत्साह गोविंदापथकातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. 

PREV
15
जोगेश्वरीत कोकण नगरचा विश्वविक्रम!

ठाण्यातील संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला. यावेळी मैदानात एकच जल्लोष झाला.

25
25 लाखांचे बक्षीस

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “कोकण नगर पथकाने मराठी एकतेची खरी ताकद दाखवली. मी आधीच पारितोषिक जाहीर केले होते. या पथकाला २५ लाखांचे बक्षीस देत आहे असेही सरनाईक यांनी म्हटले. 

35
गोविंदांचा आत्मविश्वास

जोगेश्वरीतील विशाल कोचरेकर म्हणाले, “आम्हाला आत्मविश्वास होता की यंदा आम्ही १० थर लावणार. २०२२ मध्ये आम्ही ९ थरांचा विक्रम केला होता. यावेळी पथकात ५५० गोविंदा सहभागी झाले होते. दोन महिने सतत सराव करून दहा थरांचा सराव केला होता.”

45
प्रशिक्षकाचा सल्ला आणि भावूक क्षण

पथकाचे प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांनी सांगितले की, “जखमी न होता दहा थर रचणे हेच आमचं ध्येय होतं.”विक्रम यशस्वी झाल्यावर पूर्वेश सरनाईक भावूक झाले

55
कोकणनगर गोविंदा पथकाचे कौतुक

कोकणनगर गोविंदा पथकाने 10 थरांची यशस्वी सलामी दिल्यानंतर त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतूक होत आहे. याशिवाय मानवी मनोरे रचतानाचा व्हिडीओही सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

Read more Photos on

Recommended Stories