Marathi

ठाण्यातील ५ दहिहंडीला भेट द्या, ९ थर लावणाऱ्या पथकास लाखोंचे बक्षीस

Marathi

दहीहंडीची पंढरी म्हणून ठाण्याची ओळख

दहीहंडीची पंढरी म्हणून ठाण्याची ओळख तयार झाली आहे. आपण येथील पाच मानाच्या दहीहंडीच्या ठिकाणांना भेट देऊ शकता. आपण त्याबद्दलची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Image credits: social media
Marathi

दिवंगत आनंद दिघे यांची दहीहंडी

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथे दहीहंडीला सुरुवात केली होती. येथे होणाऱ्या स्पर्धेचे पहिले बक्षीस १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

Image credits: Ashutosh Kolambkar
Marathi

आनंद चॅरिटेबल ट्रस्ट

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माजी खासदार राजन विचारे हे दहीहंडी भरवत असतात. या ठिकाणी मुंबईतील अनेक गोविंदा पथक हजेरी लावणार आहेत. आमदार आदित्य ठाकरे दहीहंडीला हजेरी लावतात.

Image credits: Ashutosh Kolambkar
Marathi

संस्कृती युवा प्रतिष्ठान

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंत्री प्रताप सरनाईक हे दहीहंडीचे आयोजन करत असतात. या ठिकाणी यंदा स्पेनमधील पथके हजेरी लावणार आहेत. येथे गोविंदा पथकांनी विक्रम केले आहेत.

Image credits: Ashutosh Kolambkar
Marathi

संकल्प प्रतिष्ठान

संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिंदे गटाचे नेते रवींद्र पाठक हे दहीहंडीचे आयोजन करत असतात. येथे लाखोंची बक्षीस पथकांना देण्यात येणार आहेत. 

Image credits: Ashutosh Kolambkar
Marathi

मनसेची हंडी

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन केले जात असते. राज ठाकरे हे या दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजर राहतात. यावर्षी मराठीचा मुद्दा येथे गाजण्याची शक्यता आहे.

Image credits: Ashutosh Kolambkar

Weekend Special : मुंबईजवळ फिरायला जायला 7 निसर्गरम्य विकेंड डेस्टिनेशन

Mahatma Jyotiba Phule Today : याच दिवशी सुरु केली होती दलितांसाठी पहिली शाळा, जाणून घ्या त्यांचे 10 प्रेरणादायी कोट्स

International Yoga Day 2025 : फडणवीस ते योगी, या मुख्यमंत्र्यांचा योग दिनात सहभाग

Mumbai Travel Places : यंदा पावसाळ्यात मुंबईजवळ असलेल्या या 5 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या