एलफिस्टन रोड जवळ देखील तुम्ही दहीहंडी पाहू शकता. येथे मनसे कार्यकर्ता मुनाफ ठाकूर यांच्या तर्फे नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहीहंडीचे निमंत्रण देण्यात आले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी मी केवळ मटण हंडीच स्विकारतो असे म्हटले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या ठिकाणी देखील तुम्ही नक्कीच दहीहंडी पाहण्यासाठी जाऊ शकता.