Weather Update: मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, २४ तासात महाराष्ट्र निघणार धुवून

Published : Sep 28, 2025, 12:20 PM IST

Weather Update: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, हवामान विभागाने मराठवाड्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट, तर बीड, लातूर, नांदेडसह सात जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

PREV
16
Weather Update: मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, २४ तासात महाराष्ट्र निघणार धुवून

महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून तुफानी पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतकरी राजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मागील ३ दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पाऊस पडला आहे.

26
मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपण आजचा हवामान अंदाज जाणून घेऊयात.

36
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज रविवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज तर उर्वरित 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या २ दिवसांत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर प्रभाव जाणवला आहे.

46
छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस होणार

छत्रपती संभाजीनगर सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाट पाऊस होणार आहे. पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

56
विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार

२८ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, जालना आणि परभणी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

66
२४ तास पावसाची शक्यता वर्तवली

२४ तास मराठवाड्यात पावसाची तीव्रता कायम राहणार आहे. त्यानंतर हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Read more Photos on

Recommended Stories