Pune Nagpur Special Train: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वेसेवा जाहीर केली आहे. ही गाडी (01215/01216) १ ऑक्टोबरला पुण्याहून सुटेल आणि २ ऑक्टोबरला नागपूरहून परतेल.
पुणे-नागपूर स्पेशल ट्रेन टाइमटेबल आणि मार्गसंपूर्ण माहिती जाणून घ्या
पुणे: दरवर्षी नागपूरमधील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली याच पवित्र स्थळी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ लाखो अनुयायी देशभरातून नागपूरमध्ये एकत्र येतात. परिणामी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी उसळते.
याच पार्श्वभूमीवर, यावर्षी मध्य रेल्वेने पुणेकरांसाठी खास सोय उपलब्ध करून दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी पुणे-नागपूर-पुणे असा विशेष रेल्वेसेवा चालवण्यात येणार आहे, ज्यामुळे भाविकांना नागपूरला जाणे आणि परत येणे अधिक सोयीचे होणार आहे.
25
विशेष गाडीचा तपशील
गाडी क्रमांक 01215 (पुणे-नागपूर)
सुटका: 1 ऑक्टोबर, दुपारी 2:50 वाजता – पुणे स्टेशन
आगमन: 2 ऑक्टोबर, सकाळी 7:30 वाजता – नागपूर स्टेशन
गाडी क्रमांक 01216 (नागपूर-पुणे)
सुटका: 2 ऑक्टोबर, रात्री 11:00 वाजता – नागपूर स्टेशन
आगमन: 3 ऑक्टोबर, संध्याकाळी 4:20 वाजता – पुणे स्टेशन
35
गाडीचे थांबे
ही विशेष गाडी पुणे, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी आणि शेवटी नागपूर येथे थांबेल.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सुरक्षेचा वाढीव बंदोबस्त तैनात केला आहे. स्थानकांवर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या असून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि वेळेत होईल यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
55
दीक्षाभूमी – बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धास्थान
दीक्षाभूमी ही केवळ एक ऐतिहासिक जागा नसून, बौद्ध अनुयायांसाठी ती श्रद्धेचं प्रतीक आहे. बाबासाहेबांनी घेतलेल्या धम्मदीक्षेच्या त्या दिवशी लाखो लोक एकत्र येतात. विशेष गाडीमुळे पुणेकर भाविकांना ही ऐतिहासिक आणि धार्मिक यात्रा अधिक सुलभ होणार आहे. ही रेल्वेसेवा ही एक सुवर्णसंधी असून इच्छुकांनी तिकीट आरक्षण लवकरात लवकर करून ठेवावे.