गौतमी पाटीलचा ड्रायव्हर अपघातावेळी नशेत होता का? आणि गौतमी? मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

Published : Oct 05, 2025, 01:44 PM IST

गौतमी पाटील: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारचा पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात झाला असून, त्यात एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गौतमीला नोटीस पाठवली होती. 

PREV
16
गौतमी पाटीलचा ड्रायव्हर अपघातावेळी नशेत होता का, मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

आपल्या डान्सने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा वादात सापडली आहे. तिच्या कारचा अपघात झाला असून त्यामध्ये एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. पुणे-बंगळूर महामार्गावर वडगाव पुलावजवळ अपघात झाला आणि त्यानंतर गौतमी परत चर्चेत आली.

26
गौतमी पाटीलला पाठवली नोटीस

रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला आहे. अपघातात सामील असलेली कार गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नावावर असल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.

36
गौतमी पाटीलचा ड्रायव्हर दारू पिला होता का?

गौतमी पाटीलचा ड्रायव्हर यावेळी दारू पिला होता का हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पोलिसांना आता ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला असून त्यामधून नेमकं काय समोर येत ते लक्षात आलं आहे.

46
मेडिकल रिपोर्टमध्ये काय समोर आलं?

मेडिकल रिपोर्टमध्ये ड्रायव्हरने मद्यसेवन केलं नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता होणाऱ्या चर्चा पूर्णपणे थांबल्या आहेत. संतोष दिनकर उभे असं ड्रायव्हरचं नाव असून, ससूनच्या प्राथमिक अहवालात ड्रायव्हरने मद्यसेवन केले नसल्याचा ससून रुग्णालयाचा रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे.

56
डोळ्याच्या बाहुल्या नेहमीप्रमाणे होत्या

ड्रायव्हर ज्या वेळी श्वास घेत होता त्यावेळी त्यामध्ये मद्याचा वास येत नव्हता. ड्रायव्हरच्या डोळ्याच्या बाहुल्या नेहमीप्रमाणे होत्या. ड्रायव्हरचे बोलणे स्थिर होते. डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे सदर व्यक्तीने मद्याचे सेवन केले नसल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. विश्लेषणात्मक तपासणीसाठी ड्रायव्हरचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

66
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय केलं?

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी गौतमीवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं म्हणून कायदेशीर बाजू समजून सांगितलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories