विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण राहील. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही.
मात्र चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसोबत पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान विभागाने येथे "यलो अलर्ट" जारी केला आहे. नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी.