Maharashtra : वसई-विरारमध्ये वाढत्या तापमानासह वीज कपात, पाणीही महागल्याने नागरिक संतप्त

Published : Apr 19, 2024, 10:59 AM ISTUpdated : Apr 19, 2024, 11:01 AM IST
Water Cut in Mumbai

सार

Vasai -Virar News : कडाक्याच्या उन्हासह वसई-विरारमधील नागरिकांना वीज कपातीचाही आता सामना करावा लागत आहे. याशिवाय काही भागात पाणी कपातीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत.

Vasai -Virar News : वसई-विरार येथे कडक्याच्या उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे. एका बाजूला कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतेय. तर दुसऱ्या बाजूला वीज कपातीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पार 38-39 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला गेला आहे. अशातच टॅंकर आणि मिनिरल्स वॉटर पुरवणाऱ्या मालकांनी आपल्या किंमतीत वाढ केली आहे. नागरिकांना वाढीव किंमतीत पाण्याची विक्री केली जात आहे.

वसई-विरारमध्ये वीज आणि पाणी कपातीमुळे नागरिक हैराण
वसई-विरारमध्ये वीज आणि पाणी कपातीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका वसई- विरारमधील ग्रामीण भागात बसत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाने म्हटले की, ग्रामीण भागामध्ये टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातोय. पण तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, पाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतायत.

पाण्याच्या किंमतीत वाढ
एका बाजूला उन्हाचा तखाडा नागरिकांना सहन करावा लागतोय. तर दुसऱ्या बाजूला पाण्याच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. टँकरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पाण्याच्या किंमतीत दुप्पटीने वाढवल्या आहेत. याशिवाय मिनिरल वॉटरच्या किंमतीतही वाढ केली आहे. (Vasi-Virar madhe pani kapat) 

या भागात पाण्याच्या तुटवडा
कामन, बेलगडी, मोरी, बाफना, जुचंद्र, चिंचोटी, कनेर, पारोल, पेल्हार, सातीवली, वाघरल पाडा, गडगा पाडा, विरार फाटास ससुनवघर, मालजी पाडा, रिचर्ड कंपाउंड, धानिवबाग, वाकन पाडासह काही ठिकाणी पाण्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. येथील नागरिकांकडे पाणी खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. पाण्यासह वीज कपातही सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून विरार-वसईत काही तास बत्ती गुल होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिक अधिक संतप्त झाले आहेत.

आणखी वाचा : 

Mumbai Heatwave: मुंबईत मोडला 14 वर्षांचा रेकॉर्ड, एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा 39.7 सेल्सिअच्या पार

RBI कडून राज्यातील या बँकेवर बंदी, नागरिकांना खात्यातून व्यवहार करता येणार? जाणून घ्या सविस्तर…

PREV

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट