Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंनी घेतलेय सुनेत्रा पवारांकडून एवढ्या लाखांचे कर्ज, बारामतीत एकमेकांविरुद्ध लढणार

Published : Apr 19, 2024, 08:52 AM ISTUpdated : Apr 19, 2024, 07:17 PM IST
Baramati Lok Sabha seat candidate

सार

Maharashtra Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभेची सीट शरद पवारांचा अनेक वर्षांपासून गड राहिला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई बारमातीत होणार आहे. 

Baramati Lok Sabha Seat Candidate : महाराष्ट्रातील बारामती लोकसभेच्या जागेवरून तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंची (MP Supriya Sule) यंदाच्या लोकसभेवेळी लढत वहिनी आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासोबत होणार आहेत. अशातच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी (18 एप्रिल) उमेदवारी अर्जासह शपथपत्रही दाखल केले. यामधून असे समोर आलेय की, सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवार यांचे 35 लाखांचे कर्ज आहे.दरम्यान, एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये उत्तम नातेसंबंध असल्याचे उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रावरून कळते.

पार्थ पवारांचेही 20 लाखांचे कर्ज
सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर अजित आणि सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यााचेही 20 लाखांचे कर्ज आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनीही पुणे येथील कौन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांची आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांची एकूण संपत्ती 114 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. खास गोष्ट अशी की, सुळे परिवाराचे स्वत:चे असे कोणतेही वाहन नाही.

सुप्रिया सुळेंची संपत्ती
सुप्रिया सुळेंकडे 2 कोटी 14लाख 97 हजार 873 रुपयांचे सोने आहे. याशिवाय स्थावर मालमत्ता 13 कोटी 81 लाख 57 हजार 342 रुपयांची आहे. बँकेतील ठेवी 15 कोटी 23 लाख 94 हजार 356 रुपयांची आहे. याव्यतिरक्त सुप्रिया सुळेंवर 55 लाखांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात सांगितले आहे. एकूण शेअर्स 50 कोटी 1 लाख 83 हजार 102 रुपयांचे आहेत. असे मिळून सुप्रिया सुळेंची एकूण मालमत्ता 166 कोटी 51 लाख 86 हजार 384 रुपयांची आहे.

सुनेत्रा पवारांची संपत्ती
सुनेत्रा पवारांनी आपल्या शपथपत्रात म्हटले की, त्यांची जंगम मालमत्ता 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपयांची आहे. याशिवाय स्थावर मालमत्ता 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपये आहे. सुनेत्रा पवार यांचे पती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेगवेगळ्या बँकांमध्ये 37.15 कोटी रुपये आहेत. सुनेत्रा पवारांच शेअर्स आणि म्युचअल फंड्समध्ये 15.79 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. 34.39 लाख रुपयांचे दागिने, त्यामध्ये एक किलो सोन्याचे दागिने आणि 35 किलो चांदीच्या भांड्यांचा समावेश आहे.

बारामती शरद पवारांचा गड
बारामती शरद पवारांचा अनेक दशकांपासूनचा गड आहे. येथे गेल्या पाच दशकांपासून पवार परिवाराचा सातत्याने विजय होत आला आहे. अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन गट झाले आहेत. यावेळी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचा गट अशी लढत होणार आहे. अजित पवारांच्या गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या गटाकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे.

आणखी वाचा : 

BJP Candidate List : अखेर एकनाथ शिंदेंनी ऐकले ! या जागेवरून नारायण राणे लढणार लोकसभा निवडणूक

Lok Sabha Election 2024 : अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर ; भाजपची 12 वी यादी प्रसिद्ध

PREV

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट