Lok Sabha Election : भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने नारायण राणे यांना तिकीट देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
Maharashtra Lok Sabah Election 2024 : भाजपने (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Mantri) यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून तिकीट दिले आहे. अशातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून उदय सामंत (Uday Samant) यांचा भाऊ किरण सामंत यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण किरण सामंत यांनी आपले नाव मागे घेतले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक रावत अशी लढत होणार आहे. रावत यांनी बुधवारी (18 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा 2019 चे निकाल
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून (Ratnagiri-Sindhudurg Seat) वर्ष 2019 मध्ये शिवसेनेकडून विनायक राउत यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती. याच जागेवरून विनायक राउत यांचा विजय झाला होता. विनायक राउत यांचा निवडणूकीत 458,022 मतांनी विजय झाला होता. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांना 2019 मध्ये 279,700 मत मिळाली होती. कांग्रेसचे नवीनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर यांना 63,299 मत मिळाली होती.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिसऱ्या टप्प्यात मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेअंतर्गत चिपळुण, रत्नागिती, राजापुर, कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीचा समावेश आहे.
नारायण राणे यांचा राजकीय प्रवास
नारायण राणे यांनी वर्ष 2005 मध्ये शिवसेनेसोबत बंड केले होते. खरंतर, राणे यांनी शिवसेनेपासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली होती. वर्ष 1968 मध्ये केवळ वयाच्या 16 व्या वर्षी नारायण राणे यांनी तरुणांना शिवसेनेसोबत जोडण्याचे काम सुरू केले. यानंतर नारायण राणे यांना चेंबूरमधील शिवसेना शाखाप्रमुखाची जबाबदारी सोपण्यात आली होती. यानंतर वर्ष 1999 मध्ये नारायण राणे यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या 13 व्या मुख्यमंत्रीच्या रुपात शपथ घेतली होती.
आणखी वाचा :
Lok Sabha Election 2024 : गडचिरोलीत 19 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान, प्रशासनाकडून कठोर व्यवस्था