शरद पवार यांना निवडणूक आयोगाने दिले 'तुतारी' पक्ष चिन्ह, रायगडावर होणार भव्य लाँचिंग सोहळा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून नवे पक्ष चिन्ह देण्यात आले आहे. यानुसार शरद पवार यांना 'तुतारी' पक्ष चिन्ह दिले आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 23, 2024 7:17 AM IST

Sharad Pawar's NCP faction New Poll Symbol : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने नवे पक्ष चिन्ह दिले आहे. यानुसार शरद पवार यांना ‘तुतारी’ पक्ष चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हामध्ये एक व्यक्ती तुतारी वाजवत असल्याचे दिसून येत आहे. हे पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय ‘तुतारी’ पक्ष चिन्ह मिळाल्याने गर्व वाटत असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीचे पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून राजगडावर भव्य लाँचिंग सोहळा पार पडण्यात येणार आहेत. यासाठी शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळी रायगडावर उपस्थितीत राहू शकतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने दिले होते नवे पक्षनाव
6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने (Election Commission) शरद पवारांच्या गटाला झटका देत अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक आयोगावर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर शरद पवारांना आपल्या पक्षासाठी नवे पक्षनाव आणि पक्ष चिन्ह निवडायचे होते.

याआधी नव्या पक्षनावासाठी शरद पवार यांनी आपल्या गटासाठी तीन नावे दिली होती- 'शरद पवार काँग्रेस', 'एमआय राष्ट्रवादी', 'शरद स्वाभिमानी'. याशिवाय पक्षचिन्ह म्हणून 'चहाचा कप', 'सूर्यफूल' आणि 'उगवता सूर्य' असे पर्याय दिले होते. अशातच निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' असे नाव दिले.

आणखी वाचा : 

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईतील पहिले मंदिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

झिशान सिद्दीकीवर काँग्रेसची मोठी कारवाई, अखिलेश यादव यांना पक्षाने दिले यूथ काँग्रेसचे अध्यक्षपद

AIMIM नेते वारिस पठाण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, माजी आमदाराने मुलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन असल्याचा लावला आरोप

Share this article