Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले, वाचा नक्की काय आहे कारण

शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना 2 मार्चला आपल्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रण पाठवले होते. पण तिघांनीही शरद पवारांचे निमंत्रण नाकारले आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 1, 2024 1:15 PM IST

Sharad Pawar Send Invitation To CM and Deputy CM for Lunch : महाराष्ट्राच्या राजकरणात गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठ्या घडामोडी झाल्याचे दिसून आले. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडली गेली. एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासोबत राहणारे अजित पवार आज भाजपची (BJP) साथ देत आहेत. अशातच शरद पवारांनी नुकत्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना 2 मार्च रोजी आपल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण पाठवले होते. पण तिघांनीही शरद पवारांचे निमंत्रण नाकारले आहे.

काय आहे प्रकरण?
शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना 2 मार्चला आपल्या निवासस्थानी भोजनासाठी आमंत्रण दिले होते. या तिघांनाही शरद पवारांना एक पत्र लिहित म्हटले की, "एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येत आहे. बारामतीत मुख्यमंत्री ‘नमो महारोजगार’ सोहळ्याला उपस्थिती लावणार असल्याने मी फार आनंदित आहे. यामुळेच मी माझ्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रण देत आहे. मला अपेक्षा आहे की, तुम्ही या निमंत्रणाचा स्विकार कराल."

या कारणास्तव नाकारले निमंत्रण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या भोजनाचे निमंत्रण शासकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने नाकारले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले की, 2 मार्चला कार्यक्रमात व्यस्त असल्याने भोजनाला उपस्थिती राहू शकत नाही.

आणखी वाचा : 

धक्कादायक ! मंत्रालयातून जारी केल्या जाणाऱ्या शासकीय कागदपत्रांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के, पोलिसात तक्रार दाखल

"माझ्या कामाची पद्धत पंतप्रधानांशी मिळती जुळती..." अजित पवारांनी खुले पत्र जारी करून सांगितले का सोडली काकांची साथ

PM Modi Maharashtra Visit : PM मोदींच्या हस्ते 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांचे वितरण

Share this article