धक्कादायक ! मंत्रालयातून जारी केल्या जाणाऱ्या शासकीय कागदपत्रांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के, पोलिसात तक्रार दाखल

मंत्रालयातून जारी केल्या जाणाऱ्या शासकीय कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मरीन लाइन्स पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Maharashtra :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के शासकीय कागदपत्रांवर वापरले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के मारलेल्या निवदेनांसह काही पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून येत मुख्यमंत्री सचिवालयाला (Chief Minister's Secretariat) मिळतात. अशातच निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई-ऑफिस प्रणालीत नोंद केली जातात. यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांना निवेदने पाठवण्यात येतात.

पण नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयाला प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी (Fake Signature) आणि शिक्के (Stamps) संशयास्पद असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले आहे. सदर प्रकार कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील स्वत: गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याबद्दल मरीन लाईन्स (Marin Lines) पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याशिवाय कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

आणखी वाचा : 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

"माझ्या कामाची पद्धत पंतप्रधानांशी मिळती जुळती..." अजित पवारांनी खुले पत्र जारी करून सांगितले का सोडली काकांची साथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातून 19 वर्षीय तरुणाला अटक

Share this article