पुण्यात शनिवारी भरधाव गाडीत जाणाऱ्या मुलाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या आरोपीला अपघात झाल्यानंतर दहा तासानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे पुण्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यात शनिवारी रात्री भरधाव जाणाऱ्या गाडीने दोन जणांना उडवले आणि त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. सतरा वर्षीय मुलाने बेडकरपणे गाडी चालवून एक तरुणी आणि तरुण मुलाला उडवले. मुलाला अटक केल्यानंतर 15 तासानंतर त्याची सुटका करण्यात आली. त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे की, न्यायालयाने अल्पवयीन असणाऱ्या गुन्हेगाराला जामीन मंजूर केला आहे. हा आरोपी पुण्यातील प्रतिष्ठित बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे.
न्यायालयाने आरोपीला कोणत्या सांगितल्या अटी -
न्यायालयाने आरोपीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्या अटींमध्ये न्ययालयाने म्हटले आहे की, "त्याला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम करावे लागेल, अपघातांवर निबंध लिहावा लागेल, त्याच्या मद्यपानाच्या सवयीवर उपचार करावे लागतील आणि समुपदेशन सत्र घ्यावे लागेल. आरोपी मुलाला या सर्व अटींचे सक्तीने पालन करावे लागणार आहे.
मध्य प्रदेशातील दोघांचा झाला मृत्यू -
मध्य प्रदेशातील असणारे अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्ठा या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. वेगाने गाडी चालवणाऱ्या मुलाने या दोघांच्या गाडीला धडक दिली. या गाडयांना धडक दिल्यानंतर हे दोघेही हवेत उंच उडाले आणि जमिनीवर पडले. अश्विनी उंच उडाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अनिश हा काहीकाळ जिवंत होता पण त्याला हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगा हा स्वतः गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या लोकांनी सांगितले आहे. मुलगा हा बारावीचे पेपर झाल्यामुळे मित्रांसोबत पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता.
आणखी वाचा -
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक केला व्यक्त
Iran President helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री बेपत्ता