नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले होते. हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती.
ईव्हीएममध्ये पण देव आहे
मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराज म्हणाले की, आम्ही सर्वात देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजाकरून वंदन केले हा आदर्श आचारसंहिते उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले.
मी एव्हीएमला हार घातला नाही
मी एव्हीएमला हार घातला नाही, कक्षात खर्ड्यावर भारत मातेचे चित्र होते त्याला हार घातला. आयोगाने आम्हाला आदर्श आचारसंहितेचे नियमावली दिली नाही, आदर्श आचारसंहितेचे नियम माहीत असता तर हे कृत्यच केले नसते. गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात माझे वकील नियमानुसार कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रिया शांतीगिरी महाराजांनी दिली आहे.